शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगाराच्या कन्येची यशस्वी भरारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 13:44 IST

सफाई कामगाराची सुकन्या शीतल श्याम सारसरने वाणिज्य शाखेतून ८२ टक्के गुण मिळवित उंच झेप घेतली आहे.

- संजय खांडेकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : घरात अठराविश्व दारिद्र्य, सोबतच कोणतेही शैक्षणिक वातावरण नसताना, सफाई कामगाराची सुकन्या शीतल श्याम सारसरने वाणिज्य शाखेतून ८२ टक्के गुण मिळवित उंच झेप घेतली आहे. शीतलच्या या यशाचे स्व. ज्योती जानोळकर कनिष्ठ महाविद्यालयात कौतुक होत आहे.स्थानिक खदान परिसरातील हनुमान आखाड्याजवळच्या मध्यमवर्गीय वसाहतीत राहणारी शीतल. तिचे वडील खासगी सफाई कामगार. आई आजारी असल्याने घरात अंथरूणावरच असते. घरात कुणालाच शिक्षणाचा गंध नाही. अशा विपरीत परिस्थिती शीतलने बारावीत वाणिज्य शाखेतून ८२ टक्के गुण मिळविले आहेत. शीतलचे हे यश गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणांएवढेच मोलाचे आहे. कारण तिने हे यश अत्यंत विपरीत परिस्थितीत मिळविलेले आहे. कोणत्याही शैक्षणिक सुविधा नसताना, केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनावर तिने हे यश मिळविले आहे. आई आजारी असल्याने स्वयंपाक, धुणीभांडी आदी घरातील दैनंदिन कामे आटोपून शीतल शाळेत येत असे आणि घरातील कामे आटोपून ती अभ्यास करायची. कोणत्याही शिकवणीविना तिने मिळविलेले यश हे निश्चितच साधारण नाही. चांगले गुण मिळवून आपल्या कुटुंबीयांना या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा मानस गुणवंत शीतलचा आहे. शीतल आपल्या यशाचे श्रेय संस्था सचिव प्रा. प्रशांत जानोळकर, संचालिका स्मिता जानोळकर, प्राचार्य पी. एस. लांडे आणि शिक्षक संजय देशमुख, माधुरी महाकाळ व पांडुरंग चौधरी या शिक्षकवृंदांना दिले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाHSC Exam Resultबारावी निकाल