शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या दिव्याखाली अंधार; कंपनीला कोट्यवधींचे देयक अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 12:29 IST

पथदिव्यांची समस्या पाहता सत्ताधारी भाजप व प्रशासनाला देयक अदा करण्याची घाई का झाली होती, असा सवाल उपस्थित झाला आहे.

अकोला: मोठा गाजावाजा करीत सत्ताधारी भाजपने मार्च २०१९ मध्ये ‘ईईएसएल’ कंपनीसोबत एलईडी पथदिव्यांचा करारनामा केला. गत काही दिवसांपासून देयकाअभावी एलईडीचा पुरवठा करण्यास कंपनीने हात आखडता घेतल्यामुळे पथदिव्यांची उभारणी रखडली आहे. दुसरीकडे २० कोटी रुपयांतून उभारलेल्या एलईडी पथदिव्यांच्या बदल्यात मे. रॉयल कंपनीला सुमारे १७ कोटींपेक्षा अधिक देयक अदा करण्यात आले असले तरी नादुरुस्त पथदिव्यांची समस्या पाहता सत्ताधारी भाजप व प्रशासनाला देयक अदा करण्याची घाई का झाली होती, असा सवाल उपस्थित झाला आहे.एलईडीचा लख्ख उजेड व त्यामुळे विजेची होणारी बचत ध्यानात घेता महापालिका स्तरावर एलईडी पथदिवे लावण्यासाठी नगर विकास विभागाने केंद्र शासन प्रमाणित ‘ईईएसएल’ (एनर्जी एफिसीएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) कंपनीची निवड केली. राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये ईईएसएल कंपनीला पथदिवे उभारणीचा कंत्राट देण्यात आला. मनपा क्षेत्रातील पथदिव्यांची एकूण संख्या, त्यावर खर्च होणारी वीज व त्याबदल्यात मनपाला प्राप्त होणारे वीज देयक आदी मुद्दे लक्षात घेता कंपनीसोबत करार करण्यात आला. कंपनीकडे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी स्वत:ची यंत्रणा नसल्यामुळे कंपनीने ही जबाबदारी ‘मिडास’नामक कंपनीकडे सोपविली. सुरुवातीला काही दिवस मिडास आणि स्थानिक कंत्राटदारांमध्ये पथदिव्यांच्या दरावरून बिनसले होते. सदर प्रकरण निस्तरल्यानंतर गत काही दिवसांपासून कंपनीच्या स्तरावरून होणारा एलईडी पथदिव्यांचा पुरवठा विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. प्रभागात पथखांब उभारल्यानंतर त्यावर एलईडी लाइट नसल्यामुळे सत्ताधारी भाजपमधील नगरसेवकांच्या डोक्याला ताप लागला आहे.

खांब उभारले; पथदिवे कधी लावणार? सत्ताधारी भाजपसह इतर राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी उत्साहाच्या भरात प्रभागांमध्ये खांब उभारले. एलईडी पथदिव्यांमुळे कसा उजेड पडेल, याचे नागरिकांकडे गुणगान केले. गत वर्षभरापासून सदर खांबांवर पथदिवे लागलेच नसल्यामुळे नागरिकांना सामोरे जाताना नगरसेवकांची चांगलीच कोंडी होत आहे. सत्तेत असल्यामुळे भाजप नगरसेवकांच्या प्रभागात पथदिव्यांचा मुहूर्त नेमका कधी निघतो, असा खोचक सवाल अकोलेकरांकडून विचारला जात आहे.

रॉयलच्या पथदिव्यांचा बोजवारा!एलईडी पथदिव्यांसाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने १० कोटींचा निधी दिला होता. यामध्ये मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून १० कोटी रुपये जमा करीत एकूण २० कोटी रुपयांतून एलईडी पथदिवे उभारण्यासाठी मे. रॉयल इलेक्ट्रॉनिक कंपनी (पुणे)ची नियुक्ती केली. यामध्ये शहरातील मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांचा समावेश आहे. एकीकडे एलईडीच्या लख्ख उजेडाचे कौतुक केले जात असले तरी दुसरीकडे गत काही दिवसांपासून रॉयल कंपनीने उभारलेल्या पथदिव्यांची यंत्रणा पूर्णत: कोलमडल्याची परिस्थिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका