गेल्या अनेक वर्षांचे पथदिव्यांचे लाईट बिल न भरल्यामुळे, बिल लाखावर पोहोचले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बिलासाठी महावितरण कंपनीने तगादा लावला असतानासुद्धा, ग्रामपंचायतने वीज बिल भरले नाही. याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. गावातील पथदिवे बंद असल्यामुळे गावात अंधार पसरला आहे. रात्रीच्यावेळी नागरिकांना बाहेर पडता येत नाही.
मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायत पथदिव्यांचे बिल थकीत असल्यामुळे महावितरणने वीज कापली आहे. पथदिव्यांचे बिल भरण्याचे काम जिल्हा परिषद विभागाचे असून त्यांना कळविले आहे. ग्रामपंचायतकडे सध्या निधी नाही.
-प्रगती नवनीत पांडे, सरपंच, कुरणखेड
ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील पथदिव्यांचे विद्युत बिल अनेक वर्षांपासून थकीत असल्यामुळे आम्ही विद्युत पुरवठा खंडित केला आहे
-स्नेहल धनावडे, कनिष्ठ अभियंता महावितरण