शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

धान्य गोदामात अंधार; सुतळीनेच शिवणार पोती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:32 IST

वीज पुरवठाच नसल्याने हातानेच पोती शिवण्यासाठी सहा महिन्यांसाठी पुन्हा सुतळी खरेदी करण्याची वेळ शासनावर आली आहे.

- सदानंद सिरसाट अकोला : राज्यातील शासकीय गोदामे अद्यापही अंधारातच आहेत. धान्याची पोती शिवण्यासाठी ११०० शिवणयंत्रांचा पुरवठा केल्यानंतर अनेक गोदामांत वीज पुरवठाच नसल्याने हातानेच पोती शिवण्यासाठी सहा महिन्यांसाठी पुन्हा सुतळी खरेदी करण्याची वेळ शासनावर आली आहे. २९ जिल्ह्यांतील शासकीय गोदामांतील धान्याच्या पोत्यांसाठी २ लाख ७६ हजार १९९ किलो सुतळीची खरेदी केली जाणार आहे.शासकीय गोदामांमध्ये धान्याचे प्रमाणीकरण झाल्यानंतर पोती शिवण्याचे काम हातानेच केले जायचे. हे काम जलद गतीने करण्यासाठी राज्यातील ५०० गोदामांमध्ये ११०० शिवणयंत्रे पुरवठा करण्याची प्रक्रिया जानेवारी २०१८ पासून सुरू झाली. आता जवळपास २० महिन्यांचा कालावधी उलटला. तरीही अनेक गोदामांत शिवणयंत्रे पोहोचली नाहीत. २९ जिल्ह्यांतील गोदामांमध्ये वीज पुरवठाही जोडला गेलेला नाही. त्यामुळे ही शिवणयंत्रे वापराविनाच पडून आहेत. त्याचवेळी पोती शिवण्यासाठी पुन्हा सुतळी खरेदी करण्याची वेळ शासनावर आली आहे. विशेष म्हणजे, आधी शिवणयंत्रांचा पुरवठा होणार असल्याने सुतळीचा पुरवठा करण्यासही शासनाने प्रचंड टाळाटाळ केली होती. त्यावर तहसीलदारांनी आवाज उठविल्याने सुतळीचा पुरवठा सुरू झाला. दरम्यान, काही ठिकाणी शिवणयंत्रे प्राप्त झाली. गोदामात वीज पुरवठा नाही. त्यामुळे शिवणयंत्रे बाजूलाच ठेवावी लागत आहेत. गोदामातील कामगारांना हाताने पोती शिवण्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे २९ जिल्ह्यांतील गोदामात सुतळी पुरवठा करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे.

 ५.३० कोटींची सुतळी खरेदीवीज पुरवठा उपलब्ध नसलेल्या २९ जिल्ह्यांतील गोदामांत धान्याची पोती शिवण्यासाठी पुढील सहा महिने ५ कोटी ३० लाख ३० हजार २०८ रुपयांची सुतळी लागणार आहे. २ लाख ७६ हजार १९९ किलो सुतळीचा पुरवठा होणार आहे. २९ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या स्तरावर सुतळी पुरविली जाणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला