शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डंम्पिंग ग्राउंडची समस्या निकाली न काढल्यास गंभीर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 14:05 IST

अकोला : डंम्पिंग ग्राउंडवर साठवणूक केल्या जाणाºया कचºयावर प्रक्रिया होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, ही समस्या तातडीने निकाली न काढल्यास आगामी दिवसांत सत्ताधाºयांसह प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा खणखणीत इशारा महापालिकेचे विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी शनिवारी दिला आहे.नायगावस्थित महापालिकेच्या मालकीच्या जागेवर ...

ठळक मुद्देमनपा विरोधी पक्षनेता साजीद खान यांचा इशारा

अकोला : डंम्पिंग ग्राउंडवर साठवणूक केल्या जाणाºया कचºयावर प्रक्रिया होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, ही समस्या तातडीने निकाली न काढल्यास आगामी दिवसांत सत्ताधाºयांसह प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा खणखणीत इशारा महापालिकेचे विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी शनिवारी दिला आहे.नायगावस्थित महापालिकेच्या मालकीच्या जागेवर कचºयाची साठवणूक केली जाते. कचºयावर प्रक्रिया होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, जलस्रोत दूषित झाले आहेत. प्रक्रिया करून कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक नागरिकांसह विविध संघटनांनी आजपर्यंत महापालिकेला असंख्य निवेदने सादर केली. त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे पाहून नागरिकांनी मनपाच्या घंटा गाड्यांची तोडफोड केली. हा प्रकार निंदनीय व अशोभनीय असला, तरी आजपर्यंत कचºयाची समस्या निकाली काढण्यासाठी सत्ताधाºयांसह प्रशासनाने काय उपाययोजना केली, असा प्रश्न उपस्थित करीत विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी सत्ताधाºयांवर शाब्दिक हल्ला चढविला आहे. नागरिकांनी घंटा गाड्यांवर दगडफेक का केली, यावर सत्ताधारी व प्रशासनाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. नागरिकांना हातात दगड घेण्यास भाग पाडणाºया सत्ताधारी पक्षातील पदाधिकाºयांवर गुन्हे का दाखल करण्यात येऊ नयेत, असा सवाल उपस्थित करीत डंम्पिंग ग्राउंडची समस्या तातडीने निकाली न काढल्यास सत्ताधाºयांसह प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विरोधी पक्षनेता खान यांनी दिला आहे.