शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीच्या वेळी दांडी; काढणीच्या वेळी जोर

By admin | Updated: March 13, 2015 01:36 IST

एका वर्षात तीन वेळा शेतकर्‍यांना ‘अवकाळी’ पावसाचा फटका

विवेक चांदूरकर / अकोला: निसर्ग शेतकर्‍यांवर कोपला असून, २0१४-१५ या वर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात पेरणीच्या वेळी आवश्यकता असताना पावसाने दांडी दिली तर काठणीच्यावेळी आवश्यकता नसताना अवकाळी पाऊस धो-धो बरसला. त्यामुळे एकाच वर्षात शेतकर्‍यांना कोरडा व ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. परिणामी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण वर्षात दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, असा गंभीर प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा ठाकला आहे. २0१४ साली खरीप हंगामात पावसाने दांडी दिली. ७ जूनपासून पावसाळ्याला सुरुवात होते. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात वर्‍हाडात पेरणी केली जाते. यादरम्यान पेरणी झाली तर पिकेही जोमात येतात. मात्र, गत वर्षी जुलै महिन्याच्या २३ तारखेला म्हणजे तब्बल दीड महिने पाऊस उशिरा आला. त्यामुळे संपूर्ण हंगामच बदलला. मूग व उडिदाची पिके बाद झाली. त्यामुळे केवळ कपाशी व सोयाबीनची पेरणी करण्यात आली. जुलै व ऑगस्ट महिन्यात पाऊस धो धो बरसला. त्यानंतर परतीचा पाऊस आलाच नाही. पेरणी तब्बल दोन महिने उशिरा झाल्यामुळे व परतीचा पाऊस न आल्यामुळे या पिकांच्याही उत्पादनात प्रचंड घट आली. जवळपास ७0 टक्के शेतकर्‍यांना खरीप हंगामात ५0 टक्क्यांपेक्षाही जास्त घट आली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. खरीप हंगामात नुकसानीचा सामना करावा लागल्यानंतर शेतकर्‍यांना रब्बी हंगामापासून अपेक्षा होती. मात्र, रब्बी हंगामातही शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच आली. परतीचा पाऊस न आल्यामुळे रब्बी हंगामात जमीन कोरडी होती. परिणामी १५ ते २0 टक्के शेतकर्‍यांनी पेरणीच केली नाही. रब्बी हंगामात हरभरा व गव्हाची मोठय़ा प्रमाणात पेरणी केली जाते. मात्र जमिनीत ओल नसल्यामुळे या पिकांच्याही उत्पादनात घट आली. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात पेरणी करण्यात आलेली ही पिके फेब्रुवारी व मार्च महिन्यात काढणीला येतात. गहू व हरभर्‍याची पिके काढणीला आली असतानाच अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. २८ फेब्रुवारीला आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला. त्यामुळे यावर्षी आवश्यकता असताना पाऊस आलाच नाही तर अवकाळी पाऊस अनेकदा बरसला.