शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दानापूर ग्रा.पं. सचिवास १० हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:30 IST

चुकीची माहिती पुरविणे व अपिलार्थीची दिशाभूल करणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तालुक्यातील दानापूर रहिवासी अपिलार्थी महादेवराव आकाजी राऊत यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम १९ (३) अन्वये जोडपत्र क नुसार आयोगाच्या स्तरावर द्वितीय अपील दाखल करून अधिनियमाचे कलम ६ (१)नुसार जनमाहिती अधिकारी तथा दानापूर ग्रा. पं. सचिव व्ही. आर. खाडे यांच्याकडे अर्ज सादर केला होता. त्यात त्यांनी माहिती अधिकारात योग्य माहिती न पुरविता चुकीची माहिती पुरविली. अपिलार्थीची दिशाभूल केली म्हणून त्यांना दंड करावा व शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निवेदन केले होते. राज्य माहिती आयुक्त अमरावती संभाजी सरकुंडे यांनी व्ही. आर. खाडे यांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.उपरोक्त जनमाहिती अधिकारी हे या माहितीशी संबंधित अभिरक्षक ठरत असल्याने ३ वर्षे ४ महिन्यांच्या कालावधीपर्यंत माहिती न देण्यास तेच जबाबदार ठरतात. जनमाहिती अधिकारी तथा सचिव ग्रामपंचायत दानापूर व्ही. आर. खाडे हे माहे सप्टेंबर २०१३ पासून आजतागायत तेथे कार्यरत आहेत. जोडपत्र अ नुसार अर्जदाराचा दाखल झालेला अर्ज त्यांनीच स्वीकृ त केलेला आहे. म्हणून त्यांच्याविरुद्ध १० हजार रुपयांची शास्ती लावण्यात येते, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रथम अपिलीय अधिकारी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा यांनी प्रस्तुत आदेश प्राप्त झाल्यापासून आगामी मासिक वेतनातून एक हजार रुपये प्रतिमहिना अशी दंडाची रक्कम संबंधिताकडून वसूल करून माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या लेखाशीर्षांतर्गत चलानद्वारे जमा करावी व चलानच्या प्रतिसह अनुपालन अहवाल आयोगास सादर करावा. संबंधित अपिलीय अधिकाऱ्यांनी केवळ प्रथम अपील अर्ज निकाली काढण्यासाठी एक उपचार म्हणून पार पडला; परंतु माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या तरतुदीला अभिप्रेत असलेली कार्यवाही पार पडली नाही म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी त्यांना यशदा प्रशिक्षणासाठी पाठवावे, माहिती अधिकाराचे प्रशिक्षण द्यावे, तसेच त्यांचे वार्षिक गोपनीय अहवालात त्यांच्या कर्तव्यच्युतीची नोंद घ्यावी, असेही आदेशात सुचविण्यात आले आहे.जोडपत्र अ नुसार अपिलार्थीने मागितलेल्या उपनिर्दिष्ट विवेचनानुसार, जनमाहिती अधिकारी यांनी संबंधिताकडून माहिती जमा करून आगामी १५ दिवसांत अपिलार्थीची पूर्तता करावी व तसा अनुपालन अहवाल आयोगास सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. जनमाहिती अधिकाऱ्यांनी अपिलार्थीस पुरविलेले असंबंध माहितीचे शुल्क १७६५ रुपये वसूल करून त्यांना आर्थिक भुर्दंड बसविला आहे. म्हणून प्राधिकरणाने अपिलार्थीस तीन हजार रुपये नुकसानभरपाई अदा करावी व त्याबाबतचा पूर्तता अहवाल आदेश मिळाल्यापासून आगामी एक महिन्याच्या आत आयोगास सादर करावा, विद्यमान प्रथम अपिलीय अधिकारी यांनी सदर निर्णयाची प्रत संबंधित जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी यांना नोंदणीकृ त डाकेने पाठवावी व त्याबाबतची पोच त्यांच्याकडे प्राप्त करून घ्यावी व तसेच आयोगास लेखी कळवावे, असे संभाजी सरकुंडे राज्य माहिती आयुक्त अमरावती यांनी आदेशाच्या शेवटी म्हटले आहे.