शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाडेवाढीच्याविरोधात दाणा बाजार बंद

By admin | Updated: May 25, 2017 01:24 IST

बाजारात शुकशुकाट; मनपा उपायुक्तांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिक ा प्रशासनाने अवाजवी भाडे वाढ केल्याच्या निषेधार्थ दाणा बाजार असोसिएशनच्या वतीने संपूर्ण मार्केट बंद ठेवण्यात आले. असोसिएशनच्या वतीने बुधवारी मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांना निवेदन सादर करण्यात आले असून, भाडेवाढीत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. शहराच्या विविध भागांत मनपाच्या मालकीची २३ व्यावसायिक संकुले आहेत. त्यामधील ४३१ पेक्षा जास्त दुकाने, गाळे अत्यल्प भाडेतत्त्वावर दिल्यामुळे त्या बदल्यात मनपाला वार्षिक अवघे ३२ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत असे. संकुलांमध्ये भाडेपट्ट्यावर दिलेली दुकाने, गाळे व भूखंडधारकांना रेडिरेकनरनुसार भाडेपट्ट्यात सुधारित दरवाढ केल्यास मनपाला वार्षिक सात ते आठ कोटींचे उत्पन्न प्राप्त होईल, असा प्रशासनाचा दावा होता. त्यानुसार सुधारित दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर ठेवला. मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी हा प्रस्ताव मंजूर होणे गरजेचे असल्यामुळे सभागृहाने व्यावसायिक संकुलांना सुधारित दरानुसार भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. सुधारित भाडेवाढीच्या नोटिस व्यावसायिकांना प्राप्त झाल्या असून, दरवाढीमुळे अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. प्रशासनाने केलेली भाडे वाढ अमान्य असल्याचे सुचवत बुधवारी दाणा बाजार असोसिएशनच्या वतीने एक दिवसाचा बंद पाळून निषेध नोंदविण्यात आला. यासंदर्भात मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांना व्यावसायिकांनी निवेदन सादर केले. हायकोर्टात कॅवेट दाखल!मनपाच्या मालकीच्या दुकानांमध्ये अत्यल्प भाडेपट्ट्यावर ठाण मांडून बसलेल्या व्यावसायिकांचा करारनामा संपुष्टात आला आहे. सुधारित भाडे वाढ मान्य नसणाऱ्या व्यावसायिकांकडून मनपाच्या निर्णयाला स्थानिक तसेच नागपूर हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता, प्रशासनाने हायकोर्टात कॅवेट दाखल केले आहे.बुधवारी पुकारला बंद!मनपाच्या निर्णयाविरोधात दाणा बाजार असोसिएशनने बुधवारी बंद ठेवून निषेध नोंदवला; परंतु सदर मार्केट बंद ठेवण्याचा दिवस बुधवार असल्यामुळे असोसिएशनने बंदसाठी बुधवारचा दिवस का निवडला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.करारनामा संपुष्टात; मनपा करणार लिलाव मनपाच्या मालकीची २३ व्यावसायिक संकुले असून, त्यामधील ४३१ पेक्षा जास्त दुकाने, गाळे अत्यल्प भाडेतत्त्वावर दिले आहेत. अनेकांचा करारनामा संपुष्टात आला आहे. अशा दुकानांचा लिलाव करण्याचे मनपाला अधिकार आहेत. त्यामुळे जे सुधारित भाडेवाढीनुसार कर जमा करणार नाहीत, त्या दुकानांचा लिलाव केला जाणार आहे. त्यासाठी संबंधित दुकानांची यादी तयार करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.