शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील जलसाठा पोहोचला ६१ टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 17:53 IST

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील धरणातील साठा आजमितीस ६१.७१ टक्क्यांपर्यंत पोहोचला; पण अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा जलसाठा ६१.७१ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच.

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील धरणातील साठा आजमितीस ६१.७१ टक्क्यांपर्यंत पोहोचला; पण अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा जलसाठा ६१.७१ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच असून, इतरही धरणांमध्ये अल्प जलसाठा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोला जिल्ह्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणाचा जलसाठा मात्र ९४.२७ टक्क्यांवर पोहोचल्याने अकोलेकरांसह शेतकºयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये ११ सप्टेंबर रोजी ६१.७१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ९४.२७ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात १०० टक्के जलसाठा संकलित झाला असून, उमा १००, मोर्णा धरणात ५१.९५ टक्के, तर वान धरणात आतापर्यंत ९०.१९ टक्के जलसाठा संकलित झाल्याने या धरणाच्या दोन द्वारातून यापूर्वी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात अद्याप एक थेंबही वाढ झाली नसल्याने या धरणाची पातळी शून्य टक्के आहे. याच जिल्ह्यातील कोराडी मध्यम धरणातील जलसाठा ८.९३ टक्के आहे. तोरणा १४.३२, तर उतावळी धरणातील पातळी ३८.८१ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यतील नळगंगा या मोठ्या धरणात १८.९० टक्के, पेनटाकळी धरणात २०.२८ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १९.९८ टक्के, पलढगमध्ये २२८.७६ टक्के, मन धरणात २५.६६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ९४.२० टक्के, एकबुर्जी व सोनल धरणात १०० टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा धरणात ४७.६४ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १००, अरुणावती ९४.२५, तर बेंबळा धरणात ६२.०२ टक्केच जलसाठा आहे.- पश्चिम वºहाडातील अकोला जिल्ह्यातील धरणात यावर्षी बºयापैकी जलसाठा संचयित झाला असून, बुलडाणा जिल्ह्यात अद्याप पावसाची गरज आहे. अकोला जिह्यात बºयापैकी जलसाठा संचयित झाल्याने यावर्षी शेतकºयांना रब्बी व उन्हाळी पिकांना सिंचनासाठी पाणी देण्यात येईल.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण