शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात रोगामुळे तीन एकरावरील कपाशी पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:24 IST

खेट्री: पातूर तालुक्यातील चांगेफळ शिवारातील अल्पभूधारक शेतकरी शेख आसीम यांच्या शेतातील तीन एकरावरील कपाशी पिकाचे अज्ञात रोगामुळे नुकसान झाले ...

खेट्री: पातूर तालुक्यातील चांगेफळ शिवारातील अल्पभूधारक शेतकरी शेख आसीम यांच्या शेतातील तीन एकरावरील कपाशी पिकाचे अज्ञात रोगामुळे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकरी शेख आसीम यांनी वारंवार कृषी विभागाशी संपर्क साधला असता, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठवडाभरानंतर बुधवारी शेतात पाहणी केली; मात्र पंचनामा न करता शेतात उभे राहून फक्त फोटो काढण्यात आल्याचा आरोप शेतकरी शेख आसीम यांनी केला आहे.

शिरपूर येथील रहिवासी शेख आसीम व नासेहा अंजुम यांची चांगेफळ शिवारात सामूहिक क्षेत्र सर्व्हे नंबर ४८/ १ , एक हेक्टर ६२ आर. अशा तीन एकरात कपाशी पिकाची पेरणी केली होती, परंतु गेल्या आठवडाभरापूर्वी अज्ञात रोगामुळे तीन एकरातील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. तीन एकरातील कपाशी पेरणीसाठी आतापर्यंत जवळपास ७० ते ८० हजार रुपये खर्च लावला; मात्र खर्च पाण्यात गेला आहे. याबाबत शेतकरी शेख आसीम यांनी कृषी विभागाशी संपर्क केल्यानंतर आठवडाभराने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात धडक दिली. सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

-----------------

कपाशी पिकाची पाहणी करण्यात आली असून, पिकावर तणनाशक फवारणी केली आहे, तसेच पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल.

- धनंजय शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर

-------------------------

गेल्या आठ दिवसांपासून तीन एकरातील कपाशी पिकावर रोग आल्यामुळे नुकसान झाले आहे. याबाबत कृषी विभागाशी वारंवार संपर्क केला; परंतु आठ दिवसांनंतर पंचनामा करणे अपेक्षित असताना थातूरमातूर पाहणी करून फोटो काढण्यात आले.

- शेख आसीम, शेतकरी, चांगेफळ

080921\img-20210908-wa0143_1.jpg

फोटो