शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत अडकली दलित वस्ती कामे

By admin | Updated: April 16, 2015 01:38 IST

ग्रामपंचायतींना डावलण्यासाठी विशेष आदेश मिळविण्याचा प्रयत्न

संतोष येलकर/ अकोला: दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत १२ कोटी ८६ लाखांच्या कामांचा आराखडा जिल्हा परिषद प्रशासनामार्फत पंधरा दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आला असला तरी; कामांचा निधी अद्यापही पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात आला नाही. ही कामे ग्रामपंचायतींऐवजी जिल्हा परिषदमार्फत करण्यासाठी शासनाकडून विशेष आदेश मिळविण्याचा जिल्हा परिषदेतील सत्ताधार्‍यांचा प्रयत्न सुरू आहे. शासनाचा विशेष आदेश मिळविण्याच्या प्रतीक्षेत मात्र आराखडा मंजूर असला तरी, जिल्ह्यातील दलित वस्तीची कामे जिल्हा परिषदेत अडकली आहेत.दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत शासनामार्फत उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील ११0 गावांमध्ये दलित वस्ती सुधारणांची कामे करण्यासाठी १२ कोटी ८६ लाखांच्या कामांचा कृती आराखडा ३0 मार्च २0१४ रोजी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत मंजूर करण्यात आला. त्यानुसार संबंधित गावांमध्ये दलित वस्ती सुधारणांची कामे ग्रामपंचायतींमार्फत करण्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांना जिल्हा परिषद प्रशासनामार्फत कामांच्या याद्या पाठविण्यात आल्या. तसेच या कामांसाठी पंचायत समितीनिहाय निधी वितरणाचा आदेशही जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यामार्फत मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांना देण्यात आला. परंतु, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामे ग्रामपंचायतीऐवजी जिल्हा परिषदमार्फत करण्यासाठी शासनाकडून विशेष आदेश मिळविण्याकरिता सत्ताधार्‍यांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आराखड्यात मंजूर जिल्ह्यातील दलित वस्तीच्या कामांचा निधी १५ मार्चपर्यंंत जिल्हा परिषदमार्फत वितरित करण्यात आला नाही. परिणामी जिल्ह्यातील १२ कोटी ८६ लाखांची मंजूर असलेली दलित वस्तीची कामे जिल्हा परिषदेत अडकली आहेत.