शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या प्रयत्नातील दरोडेखोर सीसी कॅमे-यात कैद !

By admin | Updated: January 30, 2017 03:23 IST

शेगावात दरोडेखोरांचा धुमाकुळ सुरुच

शेगाव, दि. २९- शेगाव शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरूच असून, रविवारी पहाटे स्थानिक सदगुरू नगरात दरोड्याच्या प्रयत्नात असलेले ७ दरोडेखोर सीसी कॅमेर्‍यात कैद झाले आहे.शेगाव शहरातील जगदंबा नगर भागात राहणार्‍या डॉ.काळमेघ यांच्या निवासस्थानावर महिनाभरापूर्वी सशस्त्र दरोडा पडला होता. या घटनेत दरोडेखोरांनी एका महिलेसह दोघांना जबर मारहाण केली होती. तसेच लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेनंतर शहरातील व्यंकटेश नगर, ताडी परिसरासह अन्य भागात रात्रीच्या वेळेस चोर फिरत असल्याच्या तक्रारी शहर पोलीस स्टेशनला करण्यात आलेल्या आहेत. मात्र याची दखल अद्याप पोलिसांनी घेतली नाही. मागील दरोड्यांचा तपास अद्याप लागलेला नसताना रविवारी पहाटे पुन्हा सदगुरू नगरातील एका घरात दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात दरोडेखोर सुनिल चावरे नामक इसमाच्या घरासमोर लावलेल्या कॅमेरामध्ये दरोडेखोर कैद झाले.रात्री २.३0 वा.सुमारास चावके यांना जाग आली असता अचानकपणे त्यांना सीसीटीव्हीच्या मॉनिटरमध्ये घरासमोरील गल्लीमधील घरात ७ अज्ञात चोरटे घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच घरासमोरील लाइट सुरु करून आरडाओरड केली. त्यानंतर लगेच याबाबतची माहिती शहर पोलीस स्टेशनला दुरध्वनीवरून दिली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार यशवंत बाविस्कर यांनी घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेतली. मात्र, तोपयर्ंत दरोडेखोर पसार झाले होते. वारंवार होत असलेल्या घटनांमुळे शहरात पोलीसाची गस्त काटेकोरपणे व्हावी अशी मागणी यावेळी नागरीक करीत आहेत.