शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

‘डब्बा’ माफिया भुतडा बंधू ‘बालाजी’ला शरण

By admin | Updated: June 4, 2016 02:13 IST

पोलीस अधीक्षकांचे पथक मागावर; आंध्रात बसलेय दडून.

सचिन राऊत / अकोलाअख्ख्या महाराष्ट्रात सट्टा किंग म्हणून कुख्यात असलेला व डब्बा ट्रेडिंगमधील माफिया अशी पोलीस अधीक्षकांच्या कारवाईनंतर पोलीस दप्तरी नोंद झालेला नरेश भुतडा व दिनेश भुतडा आंध्र प्रदेशातील बालाजीच्या चरणाशी शरण गेल्याची विश्‍वसनीय माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. अकोला पोलिसांचे एक विशेष पथक भुतडा बंधूच्या मागावरच असून त्यांना लवकरच बेड्या ठोकण्यात येणार आहेत.इंडियन प्रीमियर लीगमधील क्रिकेटच्या सामन्यांवर मोठय़ा प्रमाणात सट्टा देवाण-घेवाण सुरू असताना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने आकोटमध्ये छापा टाकून नरेश भुतडासह चार जणांना अटक केली होती. त्यानंतर सट्टा किंग नरेश भुतडा आणि दिनेश भुतडा बंधूंनी श्री मार्केटमधील कस्तुरी कमोडीटीजच्या माध्यमातून अनधिकृत असलेल्या सौदा सॉफ्टवेअरच्या आधारे समांतर शेअर मार्केट (डब्बा ट्रेडिंग) या बेकायदेशीर शेअर बाजाराचा पर्दाफाश केला. शासनाची कोट्यवधी रुपयांच्या कराची चोरी करून सुरू असलेल्या डब्बा ट्रेडिंगचा अवैध शेअर बाजाराचा पर्दाफाश होताच नरेश लक्ष्मीनारायण भुतडा व दिनेश लक्ष्मीनारायण भुतडा हे दोघे फरार झाले असून ते आंध्र प्रदेशातील श्रीमंत देव म्हणून ओळख असलेल्या बालाजीच्या चरणाशी गेल्याची माहिती आहे. पोलीस अधीक्षकांचे पथकही त्यांच्या मागावर असून हे दोघे लवकरच जाळय़ात अडकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणातील पोलीस कोठडीत असलेल्या दीपक महादेव राऊत, प्रशांत लाडोळे, संतोष भारसाकळे, रवींद्र भेंडारकर, गजानन मुराळे, राष्ट्रपाल भिसे, राजेश चंदन, संदीप वर्मा, उमाकांत मिश्रा यंची कसून चौकशी करण्यात येत आहे. या नऊ आरोपींच्या माध्यमातूनच भुतडा बंधू आंध्रप्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सदर पथक त्यांच्या शोधासाठी पाठविण्यात आले आहे.