अकोला - जठारपेठ चौकातील गणेश स्वीट मार्टमध्ये घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर सुरू असल्याच्या कारणावरून जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी १२ सिलिंडर जप्त केले. गणेश स्वीट मार्टचे संचालक गजानन चांडक यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जठारपेठेतील गणेश स्वीट मार्ट येथे खाद्यपदार्थ बनविण्यासाठी सर्रास घरगुती सिलिंडरचा वापर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पथकाला मिळाली. त्यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी छापा मारून गणेश स्वीट मार्ट येथून १२ सिलिंडर जप्त केले. याप्रकरणी गजानन चांडक यांना ताब्यात घेण्यात आले.
गणेश स्वीट मार्टमधून सिलिंडर जप्त
By admin | Updated: November 9, 2014 00:29 IST