चिखली : येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शहरातील गोरक्षणवाडीतील २५ वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. अंकुश लक्ष्मण पंडी तकर असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक जिल्हा परिषद मैदानावर बांधण्यात येत असलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात ४ ऑक्टोबरला सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना नालाच्या काठावर दगडाने ठेचून चेहरा छिन्नविछीन्न केलेल्या अवस् थेत एका युवकाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
दगडाने ठेचून युवकाचा खून
By admin | Updated: October 5, 2014 01:03 IST