शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

करोडपती वाणाचे सोयाबीन ठरले निकृष्ट!

By admin | Updated: September 16, 2014 18:34 IST

शेतकर्‍यांनी उभे पीक उपटून फेकले

धाड : करोडपती नावाचे वाण असलेल्या सोयाबीन पिकास फूल व फळ धारणा होत नसून, सोयाबीन पीक निकृष्ट निघाल्याने धाड भागात शेतकर्‍यांनी उभे हिरवे सोयाबीन उपटून फेकण्यास सुरुवात केली आहे.बुलडाणा तालुक्यातील धाड परिसरात कधी निसर्गाचे संकट तर कधी सुलतानी संकटाने अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांवर शेतामधील उभे हिरवे पीकच उपटून टाकण्याची वेळ येऊन ठेपल्याने शेतकरी आर्थिक संकटात चांगलाच फसला आहे.गेल्या काही वर्षात धाड व परिसरात शेतकर्‍यांचा कल हा कमी खर्चात अधिक उत्पन्न देणार्‍या सोयाबीन पिकाकडे झाला असून, या भागात सर्वाधिक प्रमाणात सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात येते.मागील दोन वर्षांपासून धाड भागात ह्यकरोडपतीह्ण नावाने सोयाबीनचे नवे वाण बाजारात आले. हे पीक एकरी १५ ते १८ क्विंटलपर्यंत उत्पन्न देत असल्याने या वाणाची पेरणी यावर्षी अंदाजे ५00 एकरावर झाली आहे.या वाणाच्या पिकास फूल व फळधारणा झाली नसल्याने शेतकरीवर्ग पुरता हवालदिल झाला. टोकण पद्धतीने लागवड केलेल्या या वाणास झडती चांगली येत असल्याने शेतकर्‍यांनी अधिक प्रमाणात यावर खर्च केला आहे. अधिक उत्पन्न पदरी पडण्याची आशा बाळगून असलेल्या शेतकर्‍यांवर निसर्गाने घाला घातला असून, सध्या हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी शेवटी नाइलाजास्तव सोयाबीन पीक उपटणे सुरू केले.करोडपती नावाने उदयास आलेल्या सोयाबीन पिकांचे झाडांना फुले व फळे लागण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकर्‍यांनी कृषी केंद्रधारकांना सल्ला विचारून महागडे औषध फवारले; मात्र परिणाम शून्य आल्याने शेवटी उभे हिरवे पीक उपटून टाकण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय उरला नाही.अगोदरच निसर्गाच्या सततच्या संकटांनी दबलेल्या शेतकर्‍यांना आणखी एका संकटास सामोरे जाण्याची वेळ आली आहे. करोडपती नावाने व टोकण पद्धतीने पेरणी केलेले सोयाबीन पीक सध्या पिवळे पडले असून, सोयाबीन सुकण्याच्या मार्गावर आहे. या स्थितीने हैराण झालेल्या शेतकर्‍यांनी शेवटी सोयाबीन उपटणे सुरू केले; मात्र या भागात खरिपाचे सोयाबीन पीक धोक्यात सापडले असताना कृषी विभागास याबाबत साधी माहिती नसल्याने कार्यवाही केली नाही वा शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले नाही. परिणामी या भागात शेतकरी वर्गातून रोष व्यक्त होत आहे. या भागात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ मदत देण्याची मागणी समोर येत आहे.