शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचणी अहवाल घेण्यासाठी होतेय गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST

तेल्हारा : कोरोना चाचणीकरिता नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे धाव घेऊन चाचणी करतात. त्यावेळी ...

तेल्हारा : कोरोना चाचणीकरिता नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे धाव घेऊन चाचणी करतात. त्यावेळी तेथे मोठी गर्दी होत आहे. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, हे पाहण्यासाठीसुद्धा चाचणीच्या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी काेरोनास निमंत्रण देणारी ठरत असल्याने, कोरोना चाचणीचा अहवाल व्हॉट्सॲप, ई-मेलवर देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कोरोना चाचणी अहवाल मोबाईल, व्हॉट्सॲप, ईमेलवर मिळाल्यास, चाचणी अहवाल देणाऱ्या केंद्रांवर नागरिकांची गर्दी होणार नाही. त्यामुळे कोरोनाच्या बचावापासून रक्षणही करता येईल. व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर मेसेजद्वारा कळविल्यास गर्दी टाळल्या जाईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोना चाचणीवर भर दिला जात आहे. मात्र चाचणीकरिता नागरिकांना जवळच्या केंद्रावर जावे लागत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणी अगोदरच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गर्दी असते आणि तेथेच चाचणी रिपोर्ट घेण्यासाठी अनेकदा झुंबड उडते.

एकीकडे शासन गर्दी टाळण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करीत असताना, दुसरीकडे कोरोना विषाणूच्या प्रसाराचे चाचणी अहवाल देणारे केंद्र होऊ नये यासाठी शासनाने चाचणी केल्यानंतर नागरिकांच्या मोबाईलवर संदेश दिला जातो. त्याचप्रमाणे त्या नागरिकांचा टेस्टिंग रिपोर्टसुध्दा मोबाईलवर दिल्यास गर्दी कमी होईल व नागरिकांना त्रास होणार नाही. शासकीय यंत्रणेवरील ताण कमी होईल.

चाचणी केल्यानंतर नागरिकांनी दिलेल्या मोबाईलवर संदेश दिल्या जातो. मात्र त्याचा अहवाल देण्याची सुविधा सिस्टिममध्ये नाही. परंतु नागरिकांना मोबाईलवर अहवाल देता येईल का, याकरिता प्रयत्न करू.

-प्रा. संजय खडसे,

निवासी उपजिल्हाधिकारी