शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचे उत्पादन बुडाले; खर्चही निघाला नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:12 IST

अकोला : कमी पावसामुळे जिल्हय़ात एकही खरीप पिकाचे  उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात राहिले नाही. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, लागवडीवर केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याची परिस्थिती असल्याने, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची जिल्हय़ातील नजरअंदाज सरासरी पैसेवारी चुकीची आणि अवास्तव आहे, अशा प्रतिक्रिया जिल्हय़ातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देपैसेवारीचा गोंधळजिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी अवास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कमी पावसामुळे जिल्हय़ात एकही खरीप पिकाचे  उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात राहिले नाही. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, लागवडीवर केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याची परिस्थिती असल्याने, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची जिल्हय़ातील नजरअंदाज सरासरी पैसेवारी चुकीची आणि अवास्तव आहे, अशा प्रतिक्रिया जिल्हय़ातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्हय़ात कमी पाऊस झाल्याने मूग, उडिदाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ८0 टक्के घट झाली असून, ‘लाल्या’सारख्या किडीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाच्या उत्पादनाचेही काही खरे नाही. त्यामुळे एकही खरीप पिकाचे उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात आले नसून, पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला  आहे. खरीप पिकांच्या लागवडीसाठी केलेल्या खर्चाच्या तुलनेत उत्पादन झाले नसल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघाला नसल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. नापिकीमुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याच्या  परिस्थितीत जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी २९ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्हय़ातील लागवडीयोग्य ९९0 गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ६१ पैसे आहे. खरीप पिकांचे बुडालेले उत्पादन, पिकांच्या लागवडीवर करण्यात आलेला खर्चही वसूल झाला नसल्याने, नापिकीचे वास्तव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी चुकीची असून, अवास्तव आहे, अशा प्रतिक्रिया जिल्हय़ातील शेतकर्‍यांसह शेतकरी नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

उडीद लागवडीवर     खर्च ६0 हजार; उत्पन्न मिळाले १५ हजार!सात एकर उडीद पिकाच्या लागवडीवर ६0 हजार रुपये खर्च केला. त्या तुलनेत पिकाच्या उत्पादनातून १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे उडीद पिकाच्या लागवडीवर केलेल्या खर्चाची रक्कमही वसूल झाली नाही, अशी व्यथा तुलंगा येथील शेतकरी समाधान सदार यांनी व्यक्त केली.

कमी पावसामुळे जिल्हय़ात मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही कमालीची घट झाली. खरिपातील कोणत्याही पिकाचे उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात येण्याची शक्यता नसल्याने, जिल्हय़ात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पीक परिस्थितीचे वास्तव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी चुकीची आणि अवास्तव आहे.-प्रदीप देशमुख, विदर्भ विभागीय चिटणीस, शेतकरी कामगार पक्ष.

मूग, उडीद पिकांचे उत्पादन झाले नाही. सोयाबीन पिकाचे ८0 टक्के उत्पादन बुडाले. कपाशी पिकाच्या उत्पादनाचेही खरे नाही. त्यामुळे खरीप हंगामातील एकही पीक शेतकर्‍यांच्या हातात राहिले नाही. नापिकीमुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने, शेतकरी संकटात सापडल्याची  परिस्थिती असताना जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी पूर्णत: अयोग्य आणि अवास्तव आहे.-प्रशांत गावंडे, जिल्हा समन्वयक, शेतकरी जागर मंच.