शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:19 IST

लोकमत इम्पॅक्ट प्रशांत विखे तेल्हारा : गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता; त्यांंना अद्यापही पीक विम्याची प्रतीक्षा ...

लोकमत इम्पॅक्ट

प्रशांत विखे

तेल्हारा : गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता; त्यांंना अद्यापही पीक विम्याची प्रतीक्षा होती. यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात होत असताना पीक विम्याची अधिकृत माहिती पीक विमा कंपन्यांकडून कृषी विभागाला देण्यात आली नव्हती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले असता पीक विमा कंपनीने तातडीने कृषी विभागाला माहिती सादर करून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्याला पीक विम्यापोटी ७७.९० कोटी रुपये मिळाले आहेत.

खरीप हंगामातील पिकांचा गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती तसेच हवामान खात्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उत्पादनात घट होऊन लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. यासाठी हजारो शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर यासह इतर पिकांचा विमा काढला असता विमा कंपनीने शेतकरी, राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून १३६ कोटी रुपये जिल्हाभरातून जमा केले. जिल्ह्याला पीक विम्यापोटी केवळ ७७.९० कोटी रुपयेच दिले आहेत.

सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान; एकाच मंडळाचा पीक विमा मंजूर

गतवर्षीच्या खरीप हंगामात सर्वात जास्त सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असताना जिल्ह्यातील केवळ तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण या एका मंडळातील शेतकऱ्यांनाच सोयाबीनचा पीक विमा मंजूर झाला असून, इतरांना फटका बसला आहे. तर एक मंडळ वगळता ५१ मंडळातील शेतकऱ्यांना मूग पिकाचा विमा मंजूर झाला आहेत. जिल्ह्यात एकूण ५२ मंडळे आहेत.

-------------------------------

अशी मिळाली पीक विम्याची मदत

पीक मंडळ मदत

उडीद ४१ ९ कोटी २३ लाख ४९ हजार रुपये

कपाशी २१ ४ कोटी ९ लाख ९६ हजार रुपये

मूग ५१ ४० कोटी ६९ लाख २९ हजार रुपये

तूर ३७ १९ कोटी ४७ लाख ८३ हजार रुपये

ज्वारी ३६ २ कोटी २० लाख ५९ हजार रुपये

सोयाबीन १२ कोटी १९ लाख ४९ हजार रुपये