शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पिके हातून गेली, पण पैसेवारी ५0 पैशांवर!

By admin | Updated: October 3, 2015 02:39 IST

प्रशासनाचा नजरअंदाज अवास्तव: शेतकरी हवालदिल.

अकोला: अत्यल्प पावसामुळे मूग व उडिदाचे पीक हातून गेले, सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला; मात्र जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या खरीप पिकांच्या नरजअंदाज पैसेवारीत केवळ ५५ गावांची पैसेवारी ५0 पैशापेक्षा कमी असून, जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रशासनमार्फत काढण्यात आलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नजरअंदाज अवास्तव पैसेवारीबाबत शेतकर्‍यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला. यावर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी पावसाने दांडी मारल्याने खरीप पेरण्या लांबल्या. तसेच अत्यल्प पाऊस झाल्याने, मूग पिकाचे उत्पादन सरासरी एकरी २0 ते २५ किलो झाले असून, उडिदाचे पीक बुडाले. अनेक ठिकाणी मूग व उडीद पिकाची वखरणी करावी लागली. त्यामुळे या पिकांच्या पेरणीसाठी केलेला खर्च भरून काढणारे उत्पादनही मिळाले नसल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. सोयाबीन पिकाचे उत्पादन एकरी सरासरी २ ते ३ क्विंटल झाल्याने, या पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. तसेच कपाशी पिकाची स्थितीही वाईट असून, दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पिकाच्या उत्पादनात ५0 ते ६0 टक्क्यांची घट होण्याची शक्यता शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. मूग व उडीद पिकांचे उत्पादन बुडाले असून, सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे. खरीप हंगामातील हातून गेलेली पिके उत्पादनात प्रचंड घट झाली असतानाच, ३0 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांकडून जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नजर पैसेवारीनुसार मात्र जिल्ह्यातील लागवडीयोग्य एकूण ९९७ गावांपैकी केवळ ५५ गावांमधील खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशापेक्षा कमी असून, उर्वरित ९४२ गावांमधील खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त आहे. हातून गेलेली पिके आणि पिकांच्या उत्पादनात झालेली प्रचंड घट बघता, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या खरीप पिकांच्या नरजअंदाज पैसेवारीवर शेतकर्‍यांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.