शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:46 IST

पातूर : पातूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून पडलेल्या पावसाने सोयाबीन पिकाला पुन्हा नुकसान पोहोचले. पर्यायाने सोयाबीन उत्पादनात पुन्हा घट होणार आहे; मात्र याचवेळी या पावसाने काही प्रमाणात कापूस व तूर या पिकाला फायदा होणार आहे.

ठळक मुद्देसोयाबीनला फुटले कोंब कापसाच्या पिकाला फटकासोयाबीनच्या उत्पादनात होणार घट!

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : पातूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून पडलेल्या पावसाने सोयाबीन पिकाला पुन्हा नुकसान पोहोचले. पर्यायाने सोयाबीन उत्पादनात पुन्हा घट होणार आहे; मात्र याचवेळी या पावसाने काही प्रमाणात कापूस व तूर या पिकाला फायदा होणार आहे.यावर्षी खरीप हंगामात पडलेल्या अल्प पावसाने सोयाबीनच्या उत्पादनावर आधीच परिणाम झाला. ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनची काढणी केली, त्यांना एकरी एक क्विंटलपासून तर अडीच क्विंटल याप्रमाणे झडती लागली. त्यामुळे शेतकर्‍यांनी सोयाबीनला लावलेला मशागतीपासून तर काढणीपर्यंत केलेला खर्चसुद्धा भरून निघाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. अजून ६0 ते ७0 टक्के शेतकर्‍यांचे सोयाबीन काढणे बाकी आहे. काहींनी सोंगून ठेवले, तर काहींच्या शेतात गंजी मारून झाकून ठेवले आहे. काहींच्या शेतात सोयाबीनचे उभेच आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतात उभे असलेल्या व परिपक्व झालेल्या सोयाबीनच्या दाण्याला काही ठिकाणी कोम फुटले आहे. त्यामुळे सोयाबीनच्या प्रतवारीत फरक पडणार आहे. शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यातच पूर्वीच्या अल्प पावसाने व काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोयाबीनच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला. उत्पादनात प्रचंड घट आल्याने पुन्हा शेतकर्‍याला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

कपाशी, तुरीला लाभ होण्याची शक्यतानवरात्रदरम्यान तापलेल्या उन्हाने जमिनीतील पाण्याचा ओलावा कमी होऊन जमीन कडक झाली होती. त्यामुळे सोयाबीनसोबत कपाशी व तुरीचे पीक सुकू लागले होते; परंतु या पावसाने जमिनीत ओलावा निर्माण झाला. त्यामुळे सध्या आलेल्या पावसामुळे कपाशी व तुरीच्या पिकाला या पावसाचा फायदा झाला आहे.-