शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

कौतुकाचा पाऊस.....पण पथकाची ओंजळ कोरडीच!

By admin | Updated: July 12, 2016 01:18 IST

गाडगेबाबा शोध पथकाचे आपत्ती व्यवस्थापनात भरीव काम; मात्र निधीची वानवा!

राजेश शेगोकार / अकोलाजिल्ह्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली, नागरिक पाण्यात अडकले किंवा आगीत सापडले, रुग्णाला तातडीने दवाखान्यात पोहोचवायचे, अडकलेल्या वन्यप्राण्याचे रेस्क्यू ऑपरेशन करायचे, या सर्व संकटातून बाहेर पडण्याच्या मदतीसाठी फक्त आणि फक्त एकच नाव असतंय, ते म्हणजे ह्यगाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक. रविवारी रात्रीसुद्धा या पथकाने अकोल्यातील डॉ. सुरेश मुंदडा, पुष्पाताई सुरेश मुंदडा आणि चालक संजय गुल्हाने अशा तिघांची मृत्यूच्या दारातून सुटका केली. दिवसभर या पथकाच्या कौतुकाचे मॅसेज सोशल मीडियामधून फिरत होते; मात्र ज्या प्रमाणे पाण्यात माशाचे अश्रू दिसत नाहीत, त्याच प्रमाणे कौतुकाच्या वर्षावात या पथकाची वेदना कोणी जाणून घेतली नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून या पथकाकडे असलेले वाहन टायरअभावी बंद आहे. रविवारी दर्यापूरकडे जाण्यासाठी त्यांना भाड्याची गाडी न्यावी लागली आहे. अकोला जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीच्या हाकेला ओ देत तत्काळ धावून जाणारा हा धेय्यवादी तरुणांचा हा संच. तब्बल १२ वर्षांपूर्वी म्हणजेच वर्षभर कार्यरत असतो. २00३ मध्ये अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातल्या पिंजर गावातल्या दीपक सदाफळे या सामाजिक विचारांनी भारलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने लोकांना जीवन देणार्‍या या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. या चळवळीच्या जन्माला एक छोटी घटना कारणीभूत ठरलीय. दीपकच्या पिंजर गावातील एका व्यक्तीचा वेळेवर दवाखान्यात नेता आले नाही म्हणून मृत्यू झालाय. एक कुटुंब उघडं पडलंय. नेमके याच घटनेच्या अस्वस्थेतून दीपकने पुढचे आयुष्य लोकांना जीवन देण्याच्या कामात खर्ची घालण्याचा निश्‍चय केलाय. त्याच्या या विचाराला गावातील २0 मित्रांनी उचलून धरले अन् याच विचारातून ह्यगाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचा जन्म झाला. या पथकाला रविवारी रात्री पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांचा फोन आला. त्यांनी दर्यापूरची स्थिती सांगितली. पालकमंत्र्यांचा फोन ठेवताच या पथकाने जुळवाजुळव करीत भाड्याने गाडी करून गयाटी नाला गाठला व सहा तासांपासून जीव मुठीत धरून असलेल्या मुंदडा परिवाराची सुटका केली. पैसे नाहीत म्हणून या पथकाने कधी आपलं काम थांबवलं नाही. प्रसंगी उसनवारी केली; पण आपला लोकांनी ह्यजीवनदायीह्ण ठरण्याचा वसा मोठय़ा ताकदीने आणि प्राणपणाने पुढे नेलाय. फक्त अकोला जिल्हाच नाही तर उत्तराखंडमधील जलप्रलय असो की माळीणची दुर्घटना, गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक सर्वच ठिकाणी मदतीसाठी समोर आणि तत्पर होतंय. पुरात अडकलेले लोक असोत की विहिरीत पडलेला बिबट्या, सर्वांना जीवनदान देण्याचे काम या चळवळीने केले आहे.