शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
2
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
3
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
4
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
5
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
6
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
7
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
8
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
9
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
10
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
11
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
12
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
13
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
14
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी
15
आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
16
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
17
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
18
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
19
Operation Sindoor : "जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
20
Operation Sindoor : "अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक

न्यायालयात जमावाची पोलिस व्हॅनवर दगडफेक

By admin | Updated: July 6, 2014 00:45 IST

हत्याकांडातील आरोपींच्या पेशीच्या वेळी घडली घटना

अकोला : शहरात २४ जून रोजी घडलेल्या हत्याकांड प्रकरणातील सात आरोपींना शनिवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी गवळीपुर्‍यातील २00 ते ३00 संख्येतील जमाव न्यायालयाच्या आवारात पोहोचला. आरोपीविरूद्ध नारेबाजी करीत जमावाने आरोपी असलेल्या पोलिस व्हॅनवर दगडफेक सुरू केली. दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला. २४ जून रोजी आर्थिक देवाण-घेवाणच्या वादातून शेख अक्रम, शेख सलीम, शेख महबूब, शेख अली व महबूब खान यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान जखमी शेख अक्रम याचा मृत्यू झाला. शेख सलीम यांच्या तक्रारीनुसार, रामदासपेठ पोलिसांनी माजी नगरसेवक शेख फरीद शेख करीम यांच्यासह शेख साजिद शेख सुलतान, शेख सुलतान शेख यासीन, शेख रशीद शेख सुलतान, शेख आरिफ शेख आमद, शेख नईम शेख गफूर, शेख रहीम शेख गफूर या सात आरोपींना अटक केली. पोलिसांनी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी गवळीपुर्‍यातील २00 ते ३00 जणांचा जमाव न्यायालय परिसरात गोळा झाला. जमावाने आरोपींविरुद्ध नारेबाजी सुरू केली. मृतकचा भाऊ मोहम्मद मसूद याने जमावाला भडकविल्याने, जमावाने पोलिस व्हॅनवर दगडफेक केली. त्यामुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. दगडफेकीत संतोष गवई नामक पोलिस कर्मचारी जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज करून जमावाला न्यायालयाच्या बाहेर काढले.