शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तर कृषी केंद्रांसह शेतक-यांवरही फौजदारी !

By admin | Updated: November 4, 2016 02:15 IST

संबंधित केंद्र संचालकांसह सात-बारा देणा-या शेतक-यांवरही फौजदारी कारवाई केली जाणार.

अकोला, दि. ३- गरजू शेतकर्‍यांना अनुदानीत बियाणे वाटप न करता बोगस नावाने ते दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यास संबंधित केंद्र संचालकांसह सात-बारा देणार्‍या शेतकर्‍यांवरही फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी दिला आहे. दरम्यान, ममदे यांनी काही केंद्रातून झालेल्या वाटपाची स्वत: चौकशी सुरू केली आहे. रब्बी हंगामासाठी महाबीजने शेतकर्‍यांना अनुदानीत दरात सहा हजार क्विंटलपेक्षाही अधिक बियाणे उपलब्ध करून दिले. त्याबाबत शेतकर्‍यांना पुरेशी माहिती होण्याआधीच ते बियाणे संपले. त्यामुळे ऐन पेरणीच्या काळात बियाणे मिळत नसल्याची ओरड सुरू झाली. शेतकर्‍यांची होणारी ससेहोलपट आणि कृषी सेवा केंद्र संचालकांनी केलेला गोंधळ, याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने लावून धरले. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तब्बल महिनाभर उशिराने कृषी केंद्राची चौकशी सुरू केली. गेल्या महिनाभराच्या काळात शेतकर्‍यांना अनुदानीत बियाणे वाटपाची पद्धत कशी राहील, त्याचा कुठलाही नियम महाबीज आणि कृषी विभागाने ठरवला नाही. नेमका त्याचाच फायदा कृषी केंद्र संचालकांनी घेतला. केंद्रात प्राप्त झालेले हरभरा बियाणे दोन ते तीन दिवसातच गायब झाले. ते नेमके कुणाला दिले, या मुद्दय़ाच्या चौकशीला कृषी विभाग लागला आहे. त्यातून आता वेगवेगळ्य़ा प्रकारे झालेला घोळ उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.