शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंड्यातील शेततळ्याच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:49 IST

अकोला : गाव तलावातील काही भागाची खासगी शेततळे म्हणून सात-बारामध्ये नोंद करून जमिनीची वहिती सुरू असल्याबाबत तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मंगळवारी दिले. गाव तलावात अतिक्रमण केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केले होते, हे विशेष. 

ठळक मुद्देअवैध नोंद रद्द होण्याची शक्यतातलाठी, मंडळ अधिकारी गोत्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गाव तलावातील काही भागाची खासगी शेततळे म्हणून सात-बारामध्ये नोंद करून जमिनीची वहिती सुरू असल्याबाबत तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मंगळवारी दिले. गाव तलावात अतिक्रमण केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केले होते, हे विशेष. खारपाणपट्टय़ात असलेल्या लाखोंडा बुद्रूक येथील गाव तलाव ग्रामस्थ आणि जनावरांना पिण्याचा पाण्यासाठी आधार आहे. त्या तलावात पावसाचे पाणी वाहून येण्याचा मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे तलावात पाण्याचा साठा होणेच बंद झाले. परिणामी, तलाव कोरडाच राहतो. पाणीटंचाईच्या काळात तलावातील पाणी उपयोगात येणेच बंद झाले. त्यातच तब्बल ९0 गुंठे क्षेत्रफळावर असलेल्या तलावातील काही जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले. लगतच शेती असलेले खातेदार राधाकिसन घावट यांनी त्यांच्या शेतात (४0 बाय ४0 मीटर) आकाराचे शेततळे असल्याची नोंद सात-बारावर केली. ही नोंद गाव तलावातील अतिक्रमण केलेल्या जमिनीची असल्याची तक्रार अकोला पंचायत समिती सदस्या रूपाली सतीश गोपनारायण यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. मंगळवारी त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे यांनी महसूल विभागाकडून तहसीलदार आणि शेततळ्यासंदर्भात कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांचा अहवाल तातडीने मागविण्यात आला. सदस्य गोपनारायण यांनीही प्रा. खडसे यांची भेट घेत त्यांना कागदोपत्री पुरावे दाखविले. त्यातही एवढय़ा मोठय़ा आकाराचे शेततळे कोणत्या यंत्रणेने केले, त्यासाठीचा आदेश, काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र न देताच फेरफार घेण्यात आल्याने त्यामध्ये घोळ असल्याची बाब पुढे आली आहे. - लाखोंडा बुद्रूक गाव तलावात अतिक्रमण असल्यास ते काढण्याचे संबंधित यंत्रणेला सांगितले जाईल. फेरफार चुकीच्या पद्धतीने केलेला असल्याचे चौकशीमध्ये पुढे आल्यास तो रद्दही करता येईल. - प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, अकोला.