शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वाडेगावच्या पतसंस्था संचालकांवर गुन्हे

By admin | Updated: August 10, 2016 01:17 IST

दोन गोदामपालांना अटक; तीनही गोदामांना सील करण्यात आले.

वाडेगाव (जि. अकोला), दि. 0९ : येथील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा मागील महिन्यापासून ५0 लाखाच्या अफरातफर प्रकरणाचा तास सुरू असताना शनिवारी सकाळपासून पतसंस्थेच्या वेअरहाऊसमधुन धान्याच्या पोत्यांचे मोजमाप करून पंचनाम्याला सुरुवात झाली होती. ही तपासणी सोमवारपर्यंत सुरू होती तर या पतसंस्थेतील वेअरहाऊसमधील धान्याचे पोत्यांचे मोजमाप करून पंचनामा करून तिन्ही गोडावून सील करण्यात आले आहे. तसेच ही चौकशी झाल्यानंतर पतसंस्थेच्या संचालक मंडळ व दोन गोदामपाल सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले.महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे इंदिरानगर वाडेगाव येथे स्वमालकीची तीन गोदामे आहेत. सदर गोडावूनमध्ये वाडेगावसह परिसरातील शेतकरी व व्यापरीवर्गाकडून शेतमाल सुरक्षित राहावा म्हणून आपले धान्य ठेवतात. या गोडावूनमधील दोन गोदामापाल व व्यापारी यांनी संगनमत करून धान्याची अफरातफर करण्यात आली असून यामध्ये संचालक मंडळ भागीदार असल्याचे दिसून आले आहे. अनेक शेतकर्‍यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला धान्य नसल्याचे तक्रारी देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा निबंधक कार्यालयाच्या चौकशी समितीने चौकशी करून या गोदामात लाखो रुपयाचा घोटाळा असल्याचे घोळ लक्षात आला आहे. या अफरातफर प्रकरणात पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक, कर्मचारी व गोदामपाल जबाबदार असल्याचे चौकशी समितीचे अधिकारी एस. मारसट्टेवार यांनी सांगितले आहे. या गोदामावर पोलिसांचा पहारा असून रात्री एकच्या सुमारास पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. यू. के. काळे, उपाध्यक्ष राजेंद्र शेंडे, संचालक प्रीुजी डोंगरे, प्रशांत पल्हाडे, हरिश्‍चंद्र जावरकर, विश्‍वनाथ धनोकार, डिगांबर चिंचोळकार, प्रभाकर डोंगरे, गजानन कातखेडे, चंद्रप्रभा चिंचोळकार, आशा घाटोळ, सुमती भुस्कूटे या मंडळासह पतसंस्थेचे व्यवस्थापक श्रीनिवास भालचंद्र चिंचोलकर आणि व्यापारी संतोष बारबुदे, गोदामपाल विजय साबळे, राजेश मसने यांच्यवर भादंवि कलम ४२0, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोन्ही गोदामपालांना अटक करण्यात करण्यात आली आहे. तसेच आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.