शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उमेश राठीसह चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:53 IST

अकोला : खोलेश्‍वर येथील एका महिलेसोबत गीतानगरमधील फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करून दुसर्‍याच्याच नावाचे खोटे धनादेश दिल्याप्रकरणी उमेश राठीसह चौघांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. उमेश राठीने अशाप्रकारे अनेकांना गंडा घातल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

ठळक मुद्देऑटोमोबाइल संचालकांना कोट्यवधींचा गंडाआत्महत्येची नाटकबाजी प्रसिद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खोलेश्‍वर येथील एका महिलेसोबत गीतानगरमधील फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करून दुसर्‍याच्याच नावाचे खोटे धनादेश दिल्याप्रकरणी उमेश राठीसह चौघांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. उमेश राठीने अशाप्रकारे अनेकांना गंडा घातल्याचा आरोपही करण्यात आला आहे.रणपिसेनगरातील रहिवासी उमेश राठी, कल्पना राठी, शेष राठी व मोना राठी या चार जणांनी खोलेश्‍वर येथील रहिवासी राजकुमारी श्रीकांत तिवारी या महिलेला गीतानगरातील एक फ्लॅट दाखविला. सदर फ्लॅट राजकुमारी तिवारी यांना पसंत पडल्यानंतर २0१६ मध्ये आठ लाख रुपयांमध्ये व्यवहार पक्का झाला. तिवारी यांनी खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला असता, उमेश राठी याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. खरेदी-विक्रीची तयारी केल्यानंतरही उमेश राठी व्यवहार करण्यासाठी पुढे येत नव्हता. तिवारी यांनी आठ लाख रुपयांची रक्कम दिल्यानंतरही उमेश राठी, कल्पना राठी, शेष राठी व मोना राठी या चार जणांनी फसवूणक सुरू केल्याचे राजकुमारी तिवारी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दिलेली आठ लाख रुपयांची रक्कम परत मागितली. मात्र, या चार जणांनी ही रक्कम परत न करता तिवारी यांना चार धनादेश दिले. यामधील एक धनादेश तिवारी यांनी १९ जुलै २0१७ रोजी बँकेत वटविण्यासाठी दिला असता, तो बाउन्स झाला. त्यानंतर अन्य तीन धनादेशाची तपासणी केली असता, यामधील दोन धनादेश हे दुसर्‍याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले. तत्पूर्वी उमेश राठी व कल्पना राठी, शेष राठी व मोना राठी या चार जणांनी तिवारी यांनी मारहाण केल्याची पोलिसांना माहिती दिली. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, उमेश राठी, कल्पना राठी, शेष राठी व मोना राठी या चार जणांनी तिवारी यांना आठ लाख रुपयांनी गंडविल्याचे समोर आले. त्यानंतर रविवारी राजकुमारी तिवारी यांच्या तक्रारीवरून उमेश राठी, कल्पना राठी, शेष राठी व मोना राठी या चार जणांविरुद्ध भारतीय दंड विधानच्या कलम ४२0, ४७१, ३२४, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑटोमोबाइल संचालकांना कोट्यवधींचा गंडाअशाच प्रकरणात एका प्रकरणामध्ये शहरातील ऑटोमोबाइल्स संचालकांना हिशेबासाठी घरी बोलावून त्यांना बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी दिली, महिलांचा विनयभंग केला, अशा खोट्या प्रकरणातही अडकविण्याचा प्रयत्न उमेश राठीने यापूर्वी केला असल्याचे ्रपकरणा पोलिसात गेले होते. त्यावेळी सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार घनश्याम पाटील यांनी सखोल तपास केला असता, प्रकरण वेगळेच असल्याचे उजेडात आले. त्यानंतर असाच प्रयत्न त्याने शनिवारीही खोलेश्‍वर येथील महिलेसोबत केला. मात्र, सिव्हिल लाइन्स पोलिसांनी योग्य तपास केल्यानंतर हे फसवणुकीचे प्रकरण उजेडात आले.

आत्महत्येची नाटकबाजी प्रसिद्धउमेश राठी याने अनेकांना अशाप्रकारे गंडा घातला असून, पैसे मागण्यासाठी येताच, पैशावाल्यांच्या छळापायी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बोलबाला राठीचे कुटुंबीय करतात. यामुळे राठीकडे असलेले पैसे न मागणे हाच एक पर्याय राहतो. राठीच्या अशा अफलातून प्रतापामुळे अनेकांनी लाखो रुपयांची रक्कम अशाच प्रकारे सोडल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.

या प्रकरणामध्ये सखोल तपास केल्यानंतर उमेश राठीसह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राठीने अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सदर प्रकरणाचा आणखी सखोल तपास करण्यात येणार आहे. उमेश राठीने आणखी कुणाला फसविले असल्यास त्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे.- अन्वर शेखठाणेदार सिव्हिल लाइन्स अकोला.