शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विकृत पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: May 27, 2017 00:49 IST

अकोला: कॅटरिंग व्यवसायात काम करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीवर डोळा ठेवून तिच्याशी जबरदस्तीने विवाह करणाऱ्या विकृत पतीसह सहा जणांविरुद्ध खदान पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कॅटरिंग व्यवसायात काम करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीवर डोळा ठेवून तिच्याशी जबरदस्तीने विवाह करणाऱ्या विकृत पतीसह सहा जणांविरुद्ध खदान पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला आहे. गत एका वर्षापूर्वी जेतवननगर येथील या युवतीने पोलिसात तक्रार दिली होती; मात्र पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवल्याने या युवतीने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.खडकी येथील रहिवासी शुभम दिनेश गोयल याने जेतवन नगरमधील एका युवतीला लग्नाचा प्रस्ताव ठेवला; मात्र युवतीने सदर युवकाला लग्न करण्यास नकार दिला; मात्र युवकाने त्यानंतर त्याची आई अंजली दिनेश गोयल, त्याचे मित्र संजय पेटले, सुमेध वाघमारे, खुशाल गव्हाळे आणि अमोल कुरील या सर्वांनी युवतीवर दबाव आणून तिला शुभम गोयल याच्याशी लग्न करण्यास भाग पाडले. या सहा जणांच्या दबावाला बळी पडत युवतीने शुभमशी विवाह केला; मात्र लग्नानंतर त्याने पत्नीवर जबरी संभोग करणे, विकृत मानसिकतेतून तिचा वेगळ्या प्रकारे शारीरिक छळ करणे, नागरिकांसमोर विविध इशारे करणे, मद्यप्राशन करून तसेच अमली पदार्थाचे सेवन करून छळ करण्यात येत होता. या छळाला कंटाळलेल्या त्याच्या पत्नीने त्याला सोडचिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने पत्नीला आत्महत्येची धमकी देत पुन्हा छळ सुरूच ठेवला. अखेर काहीही झाले तरी चालेल या अखेरच्या स्तरावर जात युवतीने त्याला सोडले; मात्र छळ सुरूच असल्याने या प्रकरणाची तक्रार तिने खदान पोलिसात केली; मात्र पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवल्याने तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खदान पोलिसांनी शुभम गोयल, अंजली गोयल व त्याच्या चार मित्रांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३७७, ३५४, ४२७, ४२०, २९४, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.