शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी, भारिप व सेनेच्या चार प्रचार वाहनचालकांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: October 8, 2014 01:03 IST

अकोला येथील तीन पोलिस ठाण्यांमध्ये चार गुन्हे.

अकोला : धावत्या वाहनातून प्रचार करून दिलेल्या परवानगीचे उल्लंघन करून आचारसंहितेचा भंग केल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ व शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार्‍या चार वाहनचालकांवर सिव्हिल लाईन, रामदासपेठ व कोतवाली पोलिसांनी मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल केला. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख गजानन शिवाजीराव गावंडे व ओंकार उदेभान डांगे यांच्या तक्रारीनुसार, भारिप-बमसंचे उमेदवार हरिदास भदे यांचा प्रचार संघपाल साहेबराव उमाळे एमएच ३0 पी ३८१२ क्रमांकाच्या ऑटोरिक्षातून करीत आहे. संघपाल हा शिवर पॉईंटवर दुपारी १२ वाजताच्या सुमारास धावत्या ऑटोतून प्रचार करीत असल्याचे दिसून आले. तसेच शिवणी परिसरात राहणारा राहुल विनायक वानखडे हा एका ठिकाणी न थांबता त्याच्या एमएच ३0 एए २२२९ क्रमांकाच्या ऑटोरिक्षातून अपक्ष उमेदवार प्रवीण वासुदेवराव जगताप यांचा प्रचार करीत असल्याचे दिसून आल्याने सिव्हिल लाईन पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस शि पाई अमीत तीर्थराज पांडेय यांच्या तक्रारीनुसार खिडकीपुर्‍यातील तन्वीर अहमद अब्दुल मोबीन (२४) हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिरीष धोत्रे यांचा त्याच्या धावत्या एमएच ३0 एए ५९९0 क्रमांकाच्या ऑटोरिक्षातून रेल्वे मालधक्क्याजवळ प्रचार करताना दिसून आला तर चौथी तक्रार कोतवालीचे ठाणेदार अनिरुद्ध आढाव यांनी केली. त्यांच्या तक्रारीनुसार सेनेचे उमेदवार गुलाबराव गावंडे यांचा धावत्या ऑटोरिक्षातून मनोज हिंमतराव चावरे हा प्रचार करताना मिळून आला. चारही वाहनचालकांविरुद्ध भादंवि कलम १८८, १३४, १३५ बीपी अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.