शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी आत्महत्येप्रकरणी रिसोडच्या मुख्याधिका-यांसह चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2016 01:26 IST

कल्पेश वर्माच्या आत्महत्या प्रकरणास तीन दिवसांनंतर कलाटणी; नगरसेविकेवरही फौजदारी.

रिसोड (वाशिम) : येथील व्यापारी युवक कल्पेश वर्माच्या आत्महत्या प्रकरणास तीन दिवसांनंतर कलाटणी मिळाली आहे. भूखंडाच्या व्यवहारातून आत्महत्या करणार्‍या कल्पेशला षडयंत्र रचून त्रास दिल्याप्रकरणी रिसोड नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर झाडे, तसेच नगरसेविका मीना अग्रवाल यांच्यासह चार जणांविरूद्ध रिसोड पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. कल्पेशचा भाऊ गोविंद वर्मा यांनी रिसोड पोलीस ठाण्याला यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार, सुनील रामकृष्ण बगडीया यांनी २00४-0५मध्ये रिसोड येथे केलेल्या एका जमिनीच्या खरेदीमध्ये कल्पेश वर्मा हा भागीदार होता. हा व्यवहार एकूण पाच प्लॉटचा होता. त्यापैकी दोन प्लॉट सुनील बगडीया आणि त्यांच्या भावाच्या नावाने, तर इतर तीन प्लॉट ताराचंद वर्मा व त्यांच्या कुटुंबातील अन्य दोन सदस्यांच्या नावावर होते. वाशिमच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून १ सप्टेंबर २0१५ रोजी ताराचंद वर्मा यांना भाडेपट्टयावर प्लॉट मिळाला. मध्यंतरीच्या काळात सुनील बगडियानी त्यापैकी अर्धा प्लॉट त्याला मिळावा, यासाठी ताराचंद वर्मा यांच्याकडे तगादा लावला. त्यांनी नकार दिल्यानंतर बगडीया यांनी नगरसेविका मीना अग्रवाल, त्यांचे पती अशोक अग्रवाल यांना हाताशी धरून वर्मा यांना त्रास देणे सुरू केले. नंतर रिसोड पालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांना हाताशी धरून वर्मा कुटुंबाच्या सामुहिक मालकीचे बांधकाम पाडण्याची नोटीस १८ मार्च २0१६ रोजी बजावण्यात आली. या नोटिशीवर वर्मा यांनी न्यायालयाकडून मनाई हुकूम आणू नये, यासाठी त्यांनी रिसोड व वाशिममध्ये कॅव्हेटही दाखल केले. तेव्हापासून आमचे कुटुंब तणावाखाली होते, असे फिर्यादीत वर्मा यांनी नमूद केले. ताराचंद वर्मा यांचा मुलगा कल्पेश हा जास्तच तणावाखाली होता. त्यातूनच त्याने ७ एप्रिल रोजी रात्री आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अशोक अग्रवाल आणि इतर तिघांच्या त्रासाचा उल्लेख केला होता. त्यानंतर कल्पेशच्या आत्महत्येस मीना अग्रवाल, त्यांचे पती अशोक, सुनील बगडीया आणि सुधाकर पानझडे हे कारणीभूत असल्याची तक्रार गोविंद वर्मा यांनी पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून रिसोड पोलिसांनी चौघांविरूद्ध भादंविचे कलम ३0६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.