शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विधिज्ञासह पाच अवैध सावकारांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: June 4, 2017 04:59 IST

एका विधिज्ञासह पाच अवैध सावकांराविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रणपिसे नगरातील रहिवासी तसेच व्यवसायाने वकील असलेल्या एका विधिज्ञासह पाच अवैध सावकांराविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार, शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या आरटीओ रोडवरील गिरी नगरातील रहिवासी मनीष गोपाळराव देशमुख यांनी तालुका उपनिबंधक सुरेखा फु पाटे यांच्याकडे शहरातील अवैध सावकारांची तक्रार केली होती. या तक्रारीवर उपनिबंधक फुपाटे यांनी मनीष देशमुख आणि त्यांच्यासोबत व्यवहार करणारे अ‍ॅड. सुनील लक्ष्मीप्रसाद अग्रवाल, हेमंत भगीरथ मिश्रा आणि विवेक खत्री तसेच वृद्ध असलेले लोडिया दाम्पत्य यांच्या दस्तावेजांची तपासणी केली. या तपासणीमध्ये उपनिबंधकांच्या कार्यालयामध्ये मनीष देशमुख व अवैध सावकार यांची सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीमध्ये तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियमाच्या कलम १६ नुसार दस्तावेजांची तपासणी केली असता सदरचा व्यवहार हा अवैध सावकारीचा असल्याचे समोर आले. त्यामुळे सावकारी अधिनियमाची योग्य पद्धतीने व प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपनिबंधक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची प्राधिकृत म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर डी. एस. जंजाळ व इतरांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात रणपिसे नगरातील रहिवासी अ‍ॅड. सुनील लक्ष्मीप्रसाद अग्रवाल, विवेक खत्री, हेमंत मिश्रा, सुधाकर लोडिया आणि त्यांची पत्नी यांच्याविरुद्ध अवैध सावकारी प्रकरणाची तक्रार दिली. या तक्रारीनुसार, रामदासपेठ पोलिसांनी सदर पाच आरोपींविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ३९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अवैध सावकारांविरुद्ध तालुका उपनिबंधक कार्यालयातून प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींचे व्यवहार हे अवैध सावकारीचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये तालुका उपनिबंधक कार्यालयाचा अहवाल महत्त्वाचा आहे.शैलेश सपकाळ,ठाणेदार, रामदासपेठ, अकोला.मनीष देशमुख यांच्यासोबत शहरातील काही लोकांनी पैशांच्या घेवाण-देवाणचा व्यवहार केला आहे. या व्यवहारातील दस्तावेजांची तपासणी केली असता तो व्यवहार अवैध सावकारीचा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आणि दोन्ही पक्षांच्या सुनावणी घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.सुरेखा फुपाटे,तालुका उपनिबंधक.सहकारी संस्था, तालुका अकोला.