शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट क्लब मैदानावर अवतरली प्रतिदीक्षाभूमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 14:13 IST

अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणाºया बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मक्रांती घडविली. या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी समतेची मशाल हाती घेत बौद्ध बांधवांचा जनसागर अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जमला.आंबेडकरी जनतेसाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा एक मंगलमय पर्वणीच असते. ...

ठळक मुद्देपुस्तके, प्रतिमांच्या साहित्याची रेलचेल

अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणाºया बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मक्रांती घडविली. या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी समतेची मशाल हाती घेत बौद्ध बांधवांचा जनसागर अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जमला.आंबेडकरी जनतेसाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा एक मंगलमय पर्वणीच असते. आंबेडकरी युवकांच्या उत्साहाला उधाण येतं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शहरातील आंबेडकरी जनतेकडून चौका-चौकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले यांच्या प्रतिमा आणि पुतळे उभारण्यात आले असून, शहरात जणू प्रतिदीक्षाभूमीच अवतरल्याचा भास होत होता. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील बुद्ध विहारांवर आकर्षक सजावट करण्यात आली. शहरातील अनेक भागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे.रविवारी दुपारपासून आंबेडकरी जनता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी एकत्र व्हायला लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून आंबेडकरी जनता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांकडे एक बहुजन नायक म्हणून पाहते. बुधवारी शेकडोंच्या संख्येने जत्थेच्या जत्थे अकोला क्रिकेट क्लब मैदानावर येत आहेत. परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अकोला क्रिकेट क्लब मैदानाकडे येणारे चारही बाजूचे रस्ते आंबेडकरी जनतेच्या गर्दीने फुलून गेले . ‘जय भीम’चा जयघोष करीत, जिल्हाभरातून ट्रॅक्टर, आॅटोरिक्षा, ट्रकसह इतर वाहनांमधून हजारो आंबेडकरी अनुयायी क्रिकेट क्लब मैदानावर दाखल होत होते. क्रिकेट क्लब मैदानावर विविध साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. खाद्यपदार्थांपासून ते पुस्तकांपर्यंतचे स्टॉल या ठिकाणी आहेत.