शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षात तयार केले ५० ‘बोन्साय’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 15:41 IST

डॉ. अनिता तिडके यांनी चक्क आपल्या परसबागेत विविध जातीचे ५० च्यावर बोन्साय वृक्ष तयार केले आहेत.

- संजय उमक  लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : माणसाला आवड असली की सवड मिळते. आपल्या व्यस्त जीवनातून सवड काढत डॉ. अनिता तिडके यांनी चक्क आपल्या परसबागेत विविध जातीचे ५० च्यावर बोन्साय वृक्ष तयार केले आहेत. याच बरोबर त्या अनेक छंद जोपासतात.अनेकदा काही गोष्टीचे प्रशिक्षण घ्यावे लागते, तर काही उपजतच माणसाच्या अंगी भिनल्या जातात. तर काहींना आपली आवड स्वस्थ बसू देत नाही. त्या आवडीनुसार वेळोवेळी आगळीकता निर्माण होत असते. असेच आगळ्यावेगळे प्रयोग करून, टाकून दिलेल्या पुरातन वस्तूपासून डॉ. अनिता तिडकेंनी विशेष वस्तूंची निर्मितीही केली आहे. डॉ. अनिता तिडके या टेक्सटाइलमध्ये एम एस्सी, पीएच.डी असून, गतवर्षी प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे त्या वस्त्र डिझाइनमध्ये पारंगत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक कलात्मक वस्त्रप्रावरणेसुद्धा निर्माण केली आहेत. शिवाय नव्या पद्धतीने गालिचेसुद्धा तयार केले आहेत. भविष्यात त्या ज्येष्ठ कवी, चित्रकार विठ्ठल वाघ यांची ग्रामीण रेखाटने व वारली कला प्रकारातील चित्रे विणकामातून प्रस्तुत करणार असून, यातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. त्यांच्या बंगल्याचे इंटेरिअर वºहाडी खांब-चौक लामणदिव्यांनी घडविले आहेत. ज्याची दखल सुरेश द्वादशीवारांनी आपल्या एका सदरात आवर्जून घेतली होती. तिडके यांनी जोपासलेल्या बोन्साय संग्रहाची लोककवी विठ्ठल वाघ, वनस्पती शास्त्राचे तज्ज्ञ-अभ्यासक डॉ. सहदेव रोठे, डॉ. जयकिरण तिडके, डॉ. नानासाहेब चौधरी, बबन नाखले यांनी दाखल घेत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याच बरोबर त्यांच्या घरातील झोपाळा, झुंबर, हंड्या आजही लक्ष वेधून घेतात. त्यांच्या विविध छंद, कलेने घराचा परिसर निश्चितच आकर्षून घेतो. बागेतील पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेले लाकडी फर्निचर काष्ठ कलेचा उत्तम नमुना आहे.

औदुंबर, वड, पिंपळाचा समावेशअनिता तिडके यांच्या परसबागेत विशेषत: बोन्साय बागेत औदुंबर, संत्री, लिंबू, चिकू हे फळांनी बहरलेले आहेत. पारंब्या आलेले वड, पिंपळ, कडूनिंब, गुलमोहर, रंगबेरंगी फुलांचे ओडीनियम, असे पन्नासेक बोन्साय वृक्ष दिमाखात उभे आहेत. यातील काही २५ ते ३० वर्षांपूर्वीचे आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर