शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करा - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 16:22 IST

राज्यात अकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

अकोला : शाश्वत पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. दुष्काळमुक्तीसाठी लोकांच्या सहकार्याने पाणी फाउडेंशनने सुरु केलेली सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा आपल्या जिल्हयाचा कायापालट करणारी ठरली आहे. यंदाही या स्पर्धेत जास्तीतजास्त लोकांनी सहभागी होऊन राज्यात अकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.पाणी फाउडेंशन सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा-4 सन -2019 बाबत नियोजन भवनात आयोजित कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, पाणी फाउडेंशनचे जिल्हा समन्वयक नरेंद्र काकड आदींसह सरपंच, तहसिलदार, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील उपस्थित होते.अकोला जिल्हयात सन 2017 पासून वॉटर कप स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सन 2019 या वर्षाकरीता बार्शिटाकळी, तेल्हारा, पातूर व अकोट या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून स्पर्धा सुरु होणार आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत शालेय व महाविदयालयनी विदयार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.पालकमंत्री म्हणाले की, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांनी जलयुक्त शिवार हा उपक्रम सुरु केला. यामुळे मोठया प्रमाणात जलसंधारणाची कामे होऊन पाणी साठे निर्माण झाले. तर पाणी फाउडेंशनने जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देऊन राज्यात एक नवी लोकचळवळ निर्माण केली. सर्व भेद विसरुन लोक एकत्र आले. गावागावांमध्ये जलसंधारणाची अनेक कामे होऊन त्यामध्ये पाणी खेळू लागले. अकोला जिल्हयातही वॉटरकप स्पर्धेसाठी लोकांचा चांगला सहभाग मिळत आहे. पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपले गाव पाणीदार करावे. या उपक्रमामध्ये मनरेगाला जोडण्याचा निश्चित प्रयत्न राहिल. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे म्हणाल्या की, प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वॉटरकप स्पर्धेत सहभागी व्हावे. आपल्या गावाला पाणी टंचाईपासून मुक्त करणाऱ्या या उपक्रमात सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. काकड यांनी प्रास्तविक केले. संचालन व आभारप्रदर्शन बार्शिटाकळी तालुक्याचे समन्वयक संघपाल वाहुरवाळ यांनी केले.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील