शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाने फरार घोषित केलेल्या दोन आरोपींना आठ वर्षांनंतर अटक

By admin | Updated: January 8, 2017 02:44 IST

बाश्रीटाकळी तालुक्यातील हाणामारी प्रकरणातील आरोपी; नावे बदलून राहत होता.

अकोला, दि. ७- बाश्रीटाकळी तालुक्यात २00८ मध्ये घडलेल्या हाणामारी प्रकरणातील आठ वर्षांपासून फरार असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. सदर दोन्ही आरोपी विविध नावे बदलून वेगवेगळय़ा शहरांमध्ये तसेच खेड्यात राहत असल्याची माहिती आहे. या दोन्ही आरोपींची योग्य ओळख नसल्याने न्यायालयाने दोन्ही आरोपींना फरार घोषित केले होते. बाश्रीटाकळी तालुक्यातील सुकळी येथे फेब्रुवारी २00८ मध्ये एका लग्न समारंभात रोकडे नामक इसमासोबत बाळापूर येथील रहिवासी आकाराम राऊजी इंगोले व पळसी येथील रहिवासी रमेश ओंकार कांबळे यांचा वाद झाला होता. यावेळी कांबळे व इंगोले या दोघांनी संगनमताने रोकडे यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी रोकडे यांनी बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये सदर दोघांविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आकाराम इंगोले आणि रमेश कांबळे या दोघांविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर बाश्रीटाकळी पोलीस या दोन आरोपींना अटक करण्यासाठी त्यांच्या गावात गेले होते; परंतु दोन्ही आरोपी गावातून फरार झाले होते. पोलिसांनी या मारहाण प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. दोषारोपपत्र सादर केल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले; मात्र सदर दोन्ही आरोपी न्यायालयासमोर आले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आरोपींना फरार घोषित करून त्यांच्याविरोधात घोषणापत्र जाहीर केले. दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठीचा अटक वारंट न्यायालयाने जारी केला. या प्रकरणातील आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात राजेश वानखडे, मंगेश मदनकार यांनी केल्यानंतर दोन्ही आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली. या दोन आरोपींमधील आकाराम इंगोले (५८) या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी तब्बल आठ वर्षांनंतर भरतपूर येथून अटक केली तर रमेश काबंळे (४५) हा हरिहरपेठ येथे बंडू कांबळे या नावाने राहत असल्याचे पोलीस तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला हरिहरपेठ येथून अटक केली. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना बाश्रीटाकळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बाश्रीटाकळी पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध शनिवारी भादंविच्या कलम १७४ नुसार आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.