शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘जीएसटी’च्या विरोधासाठी नोव्हेंबरमध्ये देशव्यापी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:45 IST

अकोला : ‘जीएसटी’च्या जाचक नियमावलींमुळे देशभरातील  व्यापारावर मोठा परिणाम जाणवत आहे. देशभरातून जीएसटी  परिषदेकडे ८५ निवेदन आले असून, प्रत्येक ठिकाणचा व्यापार  ३0 ते ७0 टक्क्यांनी घसरला आहे. जीएसटीत अनेक त्रुटी  असून, त्या दूर कराव्यात, या मागणीसाठी आता देशव्यापी बंद  पुकारला जाणार असून, त्यावर व्यापार्‍यांमध्ये विचार सुरू आहे.  बुधवारी अकोल्यात विदर्भ चेंबर्स ऑफ कॉर्मसची बुधवारी  मासिक बैठक श्रावगी टॉवर्सच्या कार्यालयात घेतली गेली. त्यात  जीएसटीला विरोध दर्शविण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात एक  दिवसीय देशव्यापी बंद छेडण्यात येणार असल्यावर चर्चा झाली.

ठळक मुद्देविदर्भ चेंबर्सच्या मासिक बैठकीत व्यापार्‍यांची आगपाखडब्रजलाल बियाणी यांची पुण्यतिथी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘जीएसटी’च्या जाचक नियमावलींमुळे देशभरातील  व्यापारावर मोठा परिणाम जाणवत आहे. देशभरातून जीएसटी  परिषदेकडे ८५ निवेदन आले असून, प्रत्येक ठिकाणचा व्यापार  ३0 ते ७0 टक्क्यांनी घसरला आहे. जीएसटीत अनेक त्रुटी  असून, त्या दूर कराव्यात, या मागणीसाठी आता देशव्यापी बंद  पुकारला जाणार असून, त्यावर व्यापार्‍यांमध्ये विचार सुरू आहे.  बुधवारी अकोल्यात विदर्भ चेंबर्स ऑफ कॉर्मसची बुधवारी  मासिक बैठक श्रावगी टॉवर्सच्या कार्यालयात घेतली गेली. त्यात  जीएसटीला विरोध दर्शविण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात एक  दिवसीय देशव्यापी बंद छेडण्यात येणार असल्यावर चर्चा झाली.  कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया यांनी जीएसटीसंदर्भात  सुरू असलेल्या देशव्यापी हालचालीवर प्रकाश टाकला.  जीएसटी पोर्टलवर अनेक तक्रारी अजूनही सुरूच आहेत. रिटर्न  अपलोड करण्याची कमी क्षमता असलेले नेटवर्क एका खासगी  एजन्सीला दिलेले आहे. दरम्यान, ऑक्टोबरच्या भरणादरम्यान  या तक्रारी अधिकच वाढत जाणार आहेत, अशी माहितीही  डालमिया यांनी दिली. कॅन्सलेशनच्या तक्रारीतून अजूनही व्या पारी-उद्योजक निघालेले नाहीत. सर्व्हर डाउनच्या तक्रारीतून  बाहेर पडण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. या सर्व समस्येतून बाहेर पडण्यासाठी नोव्हेंबरमध्ये सरकारचे  लक्ष वेधण्यासाठी नोव्हेंबरमध्ये एक दिवसीय व्यापार बंद  ठेवण्याचा विचार आहे. जिल्हा पातळीच्या उत्पादन शुल्क  कार्यालयावर आणि जीएसटीच्या कार्यालयावर व्यापारी मोर्चा  घेऊन जातील. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले  जाणार आहे. यावर विचारविनियम करण्यात आले.

ब्रजलाल बियाणी यांची पुण्यतिथीमाजी केंद्रीय मंत्री आणि विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसचे संस्थापक  ब्रजलाल बियाणी यांची पुण्यतिथी चेंबर्सच्या कार्यालयात  बुधवारी सायंकाळी साजरी झाली. महापालिकेचे महापौर विजय  अग्रवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात  आले. याप्रसंगी चेंबर्सचे ज्येष्ठ सदस्य वसंत बाछुका, अध्यक्ष  विजय पनपालिया, कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया,  सचिव निकेश गुप्ता, राजकुमार बिलाला, रमाकांत खंडेलवाल,  जी.एल. डालमिया, कृष्णा शर्मा, दिलीप खत्री आदी प्रामुख्याने  उपस्थित होते.