शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पहिला ‘काँक्रीट’ पूल झाला नव्वदीचा!

By admin | Updated: August 4, 2016 01:46 IST

गांधीग्रामचा पूर्णा नदीवरील पूल मुदतबाहय़.

अतुल जयस्वाल अकोला, दि.३- अकोला जिल्हय़ातील गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर बांधलेला पूल हा देशातील पहिला सिमेंट काँक्रीटचा पूल असून, त्याच्या बांधकामाला आजरोजी ८९ वर्ष पूर्ण झाली आहेत. कालबाहय़ झालेला हा पूल पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती असल्यामुळे येथे ह्यमहाडह्ण पूल घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मध्य प्रदेशातील हरिसाल व आंध्र प्रदेशातील हैदराबाद या दोन शहरांना जोडणारा मार्ग अकोला जिल्हय़ातून जातो. आकोट ते अकोलादरम्यान असलेल्या गांधीग्राम येथून वाहणार्‍या पूर्णा नदीवर तत्कालीन ब्रिटीश सरकारच्या अमदानीत बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन १८ जुलै १९२७ रोजी मॉटेंग्यू बटलर या ब्रिटीश अधिकार्‍याच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत हा पूल पुर्णा नदीत उभा आहे. या पुलाची उंची सहा मीटर असून, त्याला १५ मीटरचे आठ गाळे आहेत. तब्बल ९0 वर्षांचे वय झालेल्या या पुलावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा जवळचा दुवा असलेला हा पूल आता मुदतबाहय़ झाला आहे. या पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळय़ात पूर्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून वाहते. सलग दोन ते तीन दिवस या पुलावर १५ ते २0 फूट पाणी असते. एवढय़ा वर्षांपासून पुराचे तडाखे सहन केलेला हा पूल कवकुवत झाला आहे. त्यामुळे गांधीग्राम येथेही ह्यमहाडह्ण घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. ब्रिटनहून येतात पत्रगांधीग्रामचा हा पूल ब्रिटिशांच्या काळात बांधलेला आहे. त्यामुळे या पुलाचा संपूर्ण लेखाजोखा ब्रिटिश कंपनीकडे आहे. दरवर्षी या पुलाच्या देखरेखीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला ब्रिटनहून पत्र पाठविले जाते. पुलाची मुदत संपल्याचा उल्लेख या पत्रात असतो.