शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

३0 टेबलवर होणार मतमोजणी!

By admin | Updated: February 5, 2017 02:02 IST

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; ५00 अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक

संतोष येलकरअकोला, दि. ४- अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी सोमवार, ६ फेब्रुवारी रोजी अमरावती येथे करण्यात येणार आहे. ३0 टेबलवर मतमोजणी होणार असून, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायकांसह विभागातील पाचही जिल्ह्यातील ५00 अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.विधान परिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघात अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी पाचही जिल्ह्यातील २८0 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत मतदार संघातील एकूण २ लाख १0 हजार ४९१ मतदारांपैकी १ लाख ३३ हजार ५८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर निवडणूक रिंगणातील १३ उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले. या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी ६ फेब्रुवारी रोजी अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुल येथे होणार आहे. ३0 टेबलवर मतमोजणी होणार असून, मतमोजणीसाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायकांसह ५00 अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून करण्यात आली आहे. या मतमोजणीमध्ये मतपेट्यांमध्ये सीलबंद झालेल्या मतदारसंघातील १३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.निकालाची उत्कंठा शिगेला!पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे. मतमोजणीनंतर जाहीर होणार्‍या निवडणूक निकालात निवडणूक रिंगणातील उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार, याबाबत मतदारसंघातील उमेदवारांच्या सर्मथक, कार्यकर्त्यांसह पदवीधर मतदारांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.मतमोजणीसाठी नेमणूक केलेले असे आहेत अधिकारी-कर्मचारी!अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमरावती विभागीय आयुक्त, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत. तसेच मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक म्हणून महसूल विभागांतर्गत विभागीय उपायुक्त पाचही जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, लिपिक इत्यादी संवर्गातील अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.