शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कॅनॉल रोडची मोजणी; जिल्हाधिकाऱ्यांनी केली कानउघाडणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:08 IST

पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याची मोजणी शिट तयार करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाºयांनी भूमी अभिलेख विभागाला दिले.

अकोला: जुने शहरातील बहुप्रतीक्षित कॅनॉल रोडच्या शासकीय मोजणीला विलंब होत असल्याप्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भूमी अभिलेख विभाग तसेच महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी, कर्मचाºयांची सोमवारी चांगलीच कानउघाडणी केली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याची मोजणी शिट तयार करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाºयांनी भूमी अभिलेख विभागाला दिले.जुने शहरातून डाबकी रोड भागात जाण्यासाठी प्रशस्त रस्तेच उपलब्ध नाहीत. काळा मारोती रोड ते श्रीवास्तव चौक असा एकमेव अरुंद रस्ता असून, या मार्गावर वाहतुकीची प्रचंड वर्दळ राहते. डाबकी रोड भागातून शेगाव, निंबा फाटा, निमकर्दा, पारस, गायगाव आदी ठिकाणी जाण्यासाठी अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. यावर तोडगा म्हणून डाबकी रोड ते जुना बाळापूर नाका ते थेट राष्ट्रीय महामार्गावरील नवीन किराणा मार्केटपर्यंत प्रशस्त अशा कॅनॉल रोडचा पर्याय समोर आला. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी कॅनॉलच्या फेरफार नोंदीसह इतर तांत्रिक सोपस्कार पार पाडत या कॅनॉलचे आरक्षण बदलण्याचे काम निकाली काढले. तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कॅनॉलच्या शासकीय मोजणीसाठी जानेवारी २०१८ मध्ये भूमी अभिलेख विभागाकडे शुल्क जमा केले होते. आज रोजी सव्वा वर्षांचा कालावधी उलटून गेला असला तरी कॅनॉलची शासकीय मोजणी अपूर्णच असल्याचे चित्र आहे. भूमी अभिलेख विभागाकडून होणारी टाळाटाळ व महापालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे कॅनॉलच्या मोजणीला वांरवार खीळ बसली आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी त्यांच्या दालनात भूमी अभिलेख विभाग व मनपाच्या नगररचना विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी शासकीय मोजणीला विलंब होत असल्याप्रकरणी त्यांनी दोन्ही प्रशासकीय यंत्रणांची कानउघाडणी केल्याची माहिती आहे.आमदारांचे लक्ष; प्रशासन सुस्तलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तसेच १८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर कॅनॉल रोडच्या मोजणीसाठी आमदार रणधीर सावरकर यांनी मनपासह भूमी अभिलेख विभागाला सातत्याने निर्देश दिले. त्यावर दोन्ही यंत्रणा अतिशय सुस्त असल्याचे दिसून आल्याने आ. सावरकर यांनी दोन्ही यंत्रणांना धारेवर धरले होते.

दूध डेअरी रस्त्याच्या मोजणीचे निर्देशराष्ट्रीय महामार्गालगतच्या शासकीय दूध डेअरी ते थेट जवाहर नगर चौकपर्यंतच्या दूध डेअरी रस्त्याची शासकीय मोजणी का रखडली, असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित केला असता, भूमी अभिलेख विभागाचे वरिष्ठ अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. उच्चभ्रू नागरिकांनी चक्क रस्त्याची जागा हडप करून घरे उभारली. या प्रकरणाची दखल घेत या रस्त्याची तातडीने मोजणी करून अहवाल मनपाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

आम्ही जानेवारी २०१८ मध्ये शासकीय मोजणीचे शुल्क जमा केल्यानंतर भूमी अभिलेख विभागाने तातडीने मोजणी करणे अपेक्षित होते. प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीन कारभारामुळे रस्त्याच्या मोजणीला विलंब झाला. मोजणी शिट मिळताच रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल.-विजय अग्रवाल, महापौर.

 

टॅग्स :Akolaअकोला