शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दारूचा साठा जप्त

By admin | Updated: June 29, 2017 00:53 IST

खदान पोलिसांची कारवाई; दोन महिलांसह तिघे ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत खदान येथे बनावट दारूचा साठा ठेवलेल्या ठिकाणावर खदान पोलिसांनी छापा टाकून बनावट दारूचा मोठा साठा जप्त केला. ही कारवाई खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांनी बुधवारी रात्री केली असून, बनावट दारू तयार करणे आणि त्याला सीलिंग करण्याचे काम या ठिकाणावर होत असल्याचे उघड झाले आहे.खदान परिसरातील संजय मुळे याच्या मदतीने सचिन हिरामन रोकडे याने बहीण व आईला सोबत घेत देशी आणि विदेशी बनावट दारूची लेबलिंग आणि पॅकिंग मशीनच्या साहाय्याने पॅकिंग सुरू केली होती. गत चार ते पाच दिवसांपूर्वीच त्याने हा गोरखधंदा सुरू केल्याने केवळ पॅकिंग आणि लेबलिंगचेच काम सुरू होते.त्यानंतर मोठा साठा विक्रीसाठी काढण्यात येत होता; मात्र त्यापूर्वीच खदान पोलिसांना या गोरखधंद्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणावर छापा मारून दोन महिलांसह तिघांनाही ताब्यात घेतले. घटनास्थळावरून तब्बल एक लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली असून, लेबलिंग व सील करण्याचे अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे. बनावट दारूची मोठ्या प्रमाणात या ठिकाणावरून विक्री करण्यात येत असल्याचे उघड झाले असून, ही दारू मध्य प्रदेशातून आणून खदान परिसरातील एका घरात त्याची लेबलिंग आणि सील करून नंतर विक्री करण्यात येत असल्याचे पोलिसांनी छापा टाकल्यानंतर उघड झाले आहे. ही कारवाई शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात खदान पोलिसांनी केली.एमपीतून येतेय बनावट दारूखदान परिसरातील या दोन महिला आणि एक पुरुष मध्य प्रदेशातून बनावट दारू आयात करतात.त्यानंतर सदर दारूच्या बॉटल तयार करून त्याला लेबलिंग आणि सील करण्याचे काम करण्यात येते. हा प्रकार खदान पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर बनावट दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून दारूचा मोठा साठा जप्त केला.बॉम्बे स्पेशल व्हिस्कीमध्य प्रदेशात बॉम्बे स्पेशल व्हिस्की ही बनावट दारू असल्याची माहिती आहे. या दोघांनी ही दारू आयात करून ती रॉयल स्टॅग, ग्रीन लेबल, इम्पेरियल ब्लू, मॅकडोल्स या विदेशी दारूच्या खाली बाटल्यांमध्ये भरून त्याची मशीनद्वारे पॅकिंग सुरू केली होती.