बुलडाणा : पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण होत आली आहे. मतदानस्थळी ह्यडाटा एन्ट्रीह्णचे काम अचूक व्हावे, यासाठी निवडणूक शाखेत सरावासाठी यंत्रणाही उभी करण्यात आली आहे. मतमोजणीशी संबंधित प्रत्येक आकडेवारी अचूक नोंदविल्या जावी, यावर आयोगाचा भर आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. मतमोजणीस्थळी ह्यडाटा एन्ट्रीह्णची व्यवस्था केली जाते. आकडेवारी अचूक आणि आयोगाने ठरवून दिलेल्या प्रपत्रानुसार नोंदविली जावी, यासाठी या कामाचा सराव निवडणूक विभागात सुरू आहे. यासाठी विशेष डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानस्थळी डाटा एन्ट्रीची जी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, त्याची रंगीत तालीम सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विशेष सॉफ्टवेअर (इलेक्शन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर) तयार करण्यात आले आहे. नोंदविण्यात आलेली आकडेवारी अचूक आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी त्याची पडताळणीही केली जाणार आहे. १६ मे रोजी सकाळी ८ वाजता औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये मतमोजणीला सुरुवात होईल.
मतमोजणीची यंत्रणा सज्ज
By admin | Updated: May 12, 2014 00:08 IST