हिवरखेड (जि. अकोला): बेलखेड येथे कापूस चोरीप्रकरणी पित्याने दिलेल्या तक्रारीवरून मुलगा व नातवाविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. बेलखेड येथील रहिवासी चंद्रभान जानूजी भटकर यांचा मुलगा भीमराव चंद्रभान भटकर व नातू नीलेश भीमराव भटकर यांनी १३ डिसेंबर रोजी सकाळी १0 क्विंटल कापूस चोरून नेला. याबाबत चंद्रभान भटकर यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी मुलगा व नातू यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३८0 (चोरी), ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला.
कापसाची चोरी; पित्याची मुलाविरुद्ध तक्रार
By admin | Updated: December 14, 2015 02:38 IST