शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘शेड’ नसलेल्या केंद्रात कापूस खरेदी बंद होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:12 IST

पावसाळ्याच्या दिवसात कापूस भिजू नये, यासाठी राज्यातील शेड नसलेल्या केंद्रात कापूस खरेदी बंद करण्याचा आदेश कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने ४३ केंद्रांच्या प्रमुखांना ११ जून रोजी दिला आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाळ्याच्या दिवसात कापूस भिजू नये, यासाठी राज्यातील शेड नसलेल्या केंद्रात कापूस खरेदी बंद करण्याचा आदेश कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने ४३ केंद्रांच्या प्रमुखांना ११ जून रोजी दिला आहे. शेतकऱ्यांकडे असलेला कापूस पावसाळ्यापूर्वीखरेदी करण्यासाठी प्रत्येक केंद्रात दर दिवशी किमान २०० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले. तसे न झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांचा कापूस घरातच आहे. त्याच वेळी आता खरेदी केलेला कापूस ठेवण्यासाठी शेड नसल्याने खरेदी बंद केली जात आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व कापूस खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली; मात्र जिनिंग प्रेसिंग युनिट सुरू झालेली नव्हती. कापूस खरेदी कामी काही जिनिंग- प्रेसिंग युनिटधारक कापूस पणन महासंघ व सीसीआय यांना सहकार्य करीत नसल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच किरकोळ कारणाने काम बंद ठेवण्याचेही प्रकार घडले आहेत. कोणत्याही शेतकºयाचा कापूस घरात राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे शासनाने बजावले.शेतकºयांना नोंदणीसाठी मुदतही वाढवून देण्यात आली आहे. नियोजनाप्रमाणे खरेदी केंद्रावर दैनंदिन कापूस गाड्यांची संख्या ठरवून देण्यात आली. त्यातच आता राज्यातील अनेक केंद्रात खरेदी बंद होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सीसीआयच्या अकोला जिल्ह्यातील चिखलगाव, पातूर, बार्शीटाकळी, अकोट, हिवरखेड, मूर्तिजापूर, बाळापूर, बोरगावमंजू, कानशिवणी, तेल्हारा, पारस, धामणगाव रेल्वे, येवदा, मलकापूर, खामगाव, चिखली, नांदुरा, धानोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, चिमनाझरी, जलालखेडा, कळमेश्वर, नरखेड, हिंगणघाट, खरांगणा, देवळी, सेलू, वायगाव, सिंदी रेल्वे, रोहणा, मंगरूळपीर, अनसिंग, वणी, राळेगाव, घाटंजी, सिंदोळा, पांढरकवडा, दारव्हा, मोरगाव (मार्डी), वाढोणा बाजार, मुकुटबन, खैरी, समुद्रपूर (कांडली) या केंद्रांचा समावेश आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस