शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

कापसाला मिळत आहे चार हजारावर भाव

By admin | Updated: April 3, 2015 02:27 IST

शेतक-‍यांजवळचा कापूस संपला; वाढलेले भाव व्यापा-‍यांच्या हिताचे.

नाना हिवराळे /खामगाव : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकी व रूईच्या भावामध्ये वाढ झाल्याने कापसाची मागणी वाढली आहे. पर्यायाने कापसाच्या भावातही क्विंटलमागे ३00 ते ४00 रूपये दराने वाढ झाली आहे; परंतु सद्यस्थितीत शेतकर्‍यांच्या घरातच कापूस नसल्याने या वाढत्या भावाचा फायदा केवळ व्यापार्‍यांना होणार असल्याचे दिसून येते. पांढर्‍या सोन्याकडे शेतकर्‍यांचे हमी पीक म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षात गारपीट, नैसर्गिक आपत्ती आणि अत्यल्प पावसामुळे कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच बाजारातही कपाशीला शेतकर्‍यांच्या अपेक्षाएवढा भाव मिळत नसल्याने कपाशीचे पीक घेणे परवडेनासे झाले आहे. यावर्षीच्या २0१४-१५ च्या हंगामात कपाशीला शासनाकडून ३ हजार ९५0 ते ४ हजार ५0 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला होता. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ व भारतीय कपास निगम (सीसीआय) यांच्यावतीने कपाशीची खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरूवात होती. खामगाव हे कापसाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असल्याने येथे कपाशीची नेहमीच विक्रमी आवक असते. यावर्षी पणन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात जळगाव जामोद, शेगाव व देऊळगाव राजा येथे खरेदी केंद्र उघडण्यात आले होते. मार्च अखेर पणन महासंघाची जिल्ह्यात १ लाख ७ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. तर सीसीआयच्यावतीने खामगाव, नांदुरा, मलकापूर व जळगाव जामोद या चार ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. एकट्या खामगाव केंद्रावर सीसीआयने ३ लाख ५४ हजार ४३७ क्विंटल कापूस खरेदी केली. शेतकर्‍यांचे ऑनलाईन पेमेंट होऊन शेतकर्‍यांना कापसाचे १४१ कोटी ५४ लाख ४५ हजार ६७0 रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. शेतकर्‍यांना ४ हजार ७५0 रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त भाव यावर्षी मिळालाच नाही. गतवर्षी पाच हजारापेक्षा जास्त भाव कापसाला मिळाला होता. शेतकर्‍यांच्या घरातील कापूस विकल्यानंतर आता मात्र कापसाचे भाव वाढले आहेत. सद्यस्थितीत ४ हजार ३00 ते ४ हजार ४00 रुपये प्रतिक्विंंटल कापसाला भाव मिळत आहे; परंतु जवळपास ९५ टक्के शेतकर्‍यांच्या घरातून कापूस हद्दपार झाला आहे. शेतकर्‍यांना आर्थिक चणचण भासत असल्याने शेतकर्‍यांनी पडेल भावात कापूस विकला आहे. ३ हजार ५00 ते ३ हजार ६00 रुपये दराने शेतकर्‍यांनी कापूस विकला; मात्र आता ४ हजार ३00 ते ४ हजार ४00 रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वाढत्या भावाचा शेतकर्‍यांना फटका बसला असून, वाढलेला भाव व्यापार्‍यांच्या पथ्यावर पडणारा आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकर्‍यांना वाढत्या भावापासून वंचित राहावे लागले आहे.