शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला अद्याप बोनस नाहीच!

By admin | Updated: March 18, 2016 02:11 IST

अधिवेशनाकडे शेतक-यांचे लागले डोळे.

अकोला: कापूूस उत्पादक शेतकर्‍यांना अग्रीम बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली खरी; पण अग्रीम बोनस अद्याप मिळाला नसून, खासगी बाजारात अपेक्षित दर मिळाले नसल्याने सात बारा बघून शेतकर्‍यांना अग्रीम बोनस देण्यात यावे, या मागणीसाठी शेतकर्‍यांचे डोळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहे. मागील वर्षी विदर्भातील शेतकर्‍यांनी जवळपास १५ लाख ३0 हजार क्विंटल क्षेत्रावर कपाशीची पेरणी केली होती; परंतु पावसाच्या अनियमिततेचा फटका बसल्याने प्रचंड नुकसान झाले असून, हेक्टरी दोन-तीन क्विंटल उतारा आला. परिणामी यावर्षी राज्यातील कापसाचे उत्पादन जवळपास ५0 टक्क्यांनी घटले आहे. उत्पादन खर्चावर आधारित हमी दर नसल्याने शेतकर्‍यांनी या पिकासाठी लावलेला उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांची भिस्त शासनाच्या मदतीवर होती. शासनाने अग्रीम बोनसची घोषणा केल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण अद्याप या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. आजमितीस कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. वरू न दुष्काळाचा सामना करीत आहे. या परिस्थितीत शेतकर्‍यांना तातडीच्या मदतीची गरज असल्याचा सूर शेतकरी नेत्यांमध्ये उमटत आहे.गुजरात शासनाने तेथील शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ६00 रुपये बोनस दिल्याने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि अग्रीम बोनस देण्याची घोषणा शासनाने केल्याने शेतकर्‍यांना या मदतीची प्रतीक्षा होती; परंतु तीन महिने उलटले तरी बोनस न मिळाल्याने शेतकर्‍यांचे लक्ष या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहे. यावर्षी कापसाचा हमी दर ४१00 रुपये प्रतिक्विंटल आहे; परंतु भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि सीसीआयचा उपअभिकर्ता महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाने कापसाची प्रतवारी बघून प्रत्यक्षात ३८५0 ते ३९00 रुपये प्रतिक्विंटल या दरानेच कापूस खरेदी केला असल्याच्या शेतकर्‍यांनी सुरुवातीला तक्रारी केल्या आहेत. या सर्व परिस्थितीत शासन काय निर्णय घेते, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.