शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी : पाचशे कोटी रू पयांचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 18:23 IST

राज्य शासनाने १८०० कोटी रू पयांची बँक गॅरटी घेतल्याने पणन महासंघाला दिलासा मिळाला आहे.

अकोला : महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने यावर्षी ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असून,आतापर्र्यत १,३२५ कोटी रू पयांचे चुकारे करण्यात आले आहेत.पंरतु ५२५ कोटी रू पये थकले आहेत. राज्य शासनाने १८०० कोटी रू पयांची बँक गॅरटी घेतल्याने पणन महासंघाला दिलासा मिळाला आहे.आधारभूत किमतीपेक्षा दर जास्त व विक्री केलेल्या कापसाची रक्कम लगेच मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली होती. यावर्षी मात्र शेतकऱ्यांनी पणन महासंघाला पसंती दिली असून, खरेदी केंद्रावर दररोज कापसाची आवक वाढत आहे. राज्यात आतापर्यंत ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.खरेदी केलेला हा कापूूस १,८५० कोटी रू पयांचा असून, शेतकºयांना त्यातील १,३२५ कोटी रू पयांचे चुकारे करण्यात आले आहेत. उर्वरित चुकारे देण्याची प्रक्रिया संथ होती.दरम्यान,उपमुख्यमंत्री अजित पवार गत आठवड्यात अमरावती दौºयावर असताना महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख तसेच संचालक मंडळ पवार यांना भेटून पणन महासंघाची माहिती दिली . शेतकºयांचे चुकारे करायचे असतील तर शासनाला बँकेची गँरटी घ्यावी लागणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले.शासनाने याची दखल घेत १८०० कोटी रू पयांची बँक गॅरंटी घेतली आहे.त्यामुळे पणन महासंघाला बॅकाकडून कर्ज मिळणे सुलभ झाले असून,लवकरच उर्वरित चुकारे केले जाणार आहेत. पणन महासंघाने यावर्षी जरी ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असला तरी भारतीय कापूस महामंडळ १५ लाख क्ंिवटलच्यावर पणन महासंघाला कमीशन देणार नाही.यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.यासंदर्भात पणन महासंघाच्या संचालक मंडळाची १२ फेब्रुवारी रोजी बैठक होणार असून, उपमुख्यमंत्री व पणन मंत्र्यानाही भेटणार आहेत.बँक गॅरंटी वाढवावी ही देखील मागणी केली जाणार असल्याचे वृत्त आहे.

 ‘पनण’ने यावर्षी १,८५० कोटी रू पयांचा कापूस खरेदी केला आहे.१,३२५ कोटींचे चुकारे केले आहेत.उर्वरित चुकाºयांची प्रक्रिया सुरू आहे.शासनाने बँक गॅरंटी घेतल्याने दिलासा मिळाला आहे.गँरटी वाढवून मिळावी ही मागणी करणार आहे.- राजाभाऊ देशमुख,अध्यक्ष,पणन महासंघ,अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस