शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निंभोरा ग्रामपंचायतमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 10:35 IST

Fraud in Grampanchayat Akola District भ्रष्टाचार झाल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे.

ठळक मुद्देगट विकास अधिकाऱ्याच्या अहवालामध्ये सरपंच दोषी आढळून आले आहेत. गटविकास अधिकाऱ्याने दिला पोलिसात फिर्याद दाखल करण्याचा आदेश.
वलभनगर: निभोरा गट ग्रांपचायतमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सचिवास पोलिसात फिर्याद देण्याचा आदेश १२ आक्टोबर रोजी दिला आहे. येथून जवळच असलेल्या निभोरा गट ग्रांमपचायतमध्ये कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रा.पं. सदस्य कल्पना भगत यांनी ६ ऑगस्ट २०१८ मध्ये पालकमंत्र्यांच्या जनता दरबारमध्ये केली होती. त्यानुसार गट विकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करून १० फेब्रुवारी २०२० रोजी पूर्ण केली. याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अकोलाकडे दिला आहे. गट विकास अधिकाऱ्याच्या अहवालामध्ये सरपंच दोषी आढळून आले आहेत. तरीही अद्याप कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर ग्रा.पं. सदस्याने ७ ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी तक्रार देऊन दोषीविरुद्ध कारवाइ करण्याची मागणी केली होती. अखेर १२ आक्टोबर रोजी गट विकास अधिकाऱ्यांनी याप्रकरणी ग्रामपंचायत सचिवास दोषिंविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल करण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल करण्याचा आदेश प्राप्त झाला असून, याबाबत वरिष्ठांशी सविस्तर चर्चा करून कार्यवाही करण्यात येईल.- अनंत वावगे, ग्रा.पं. सचिव, निंभोरा.
टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायतfraudधोकेबाजी