शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

हार्डशिप अ‍ॅॅण्ड कम्पाउंडिंगचे दर निश्चित करण्याचा अधिकार महापालिकांना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 13:20 IST

नगर विकास विभागाने फेरविचार करीत दर निश्चित करण्याचा अधिकार महापालिकांच्या स्तरावर महासभेला सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.

- आशिष गावंडे

अकोला: राज्य शासनाने ‘ड’ वर्ग महापालिकांसाठी सुधारित ‘डीसीआर’(विकास नियंत्रण नियमावली) लागू केल्यानंतर डिसेंबर २०१५ पूर्वी उभारलेल्या इमारती, घरांच्या अनधिकृत बांधकामांना नियमानुकूल करण्यासाठी हार्डशिप अ‍ॅण्ड कम्पाउंडिंगची नियमावली तयार केली. या नियमावली अंतर्गत लागू केलेले दर जास्त असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगर विकास विभागाने फेरविचार करीत दर निश्चित करण्याचा अधिकार महापालिकांच्या स्तरावर महासभेला सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासन लवकरच अधिसूचना जारी करणार असल्याची माहिती आहे.महापालिका क्षेत्रात इमारतींच्या बांधकामासाठी एक चटई निर्देशांक (एफएसआय) मंजूर होता. त्यामुळे इमारतींचे बांधकाम करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बांधकाम व्यावसायिकांची ओरड ध्यानात घेऊन राज्य शासनाने ‘ड’ वर्ग महापालिकांसाठी सुधारित ‘डीसीआर’ लागू करून एफएसआय १.१ इतका वाढविला. बहुतांश बांधकाम व्यावसायिकांनी इमारतींचे निर्माण करताना फ्र न्ट मार्जिन (मुख्य रस्त्यालगत इमारतीचा दर्शनी भाग), साइड मार्जिन तसेच बॅक मार्जिन (इमारतीच्या मागील सर्व्हिस लाइनकडील भाग) कडे दुर्लक्ष केले. पहिला मजला वगळल्यास दुसऱ्या मजल्यापासून साइड व बॅक मार्जिनचा मनमानीरीत्या वापर केल्याचे चित्र आहे. यामुळे त्या-त्या भागात विकास कामे करताना महापालिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशा इमारतींवर कारवाई न करता त्यावर तोडगा काढण्याची विनंती बांधकाम व्यावसायिकांनी शासनाकडे केली असता, ‘ड’ वर्ग महापालिकांसाठी हार्डशिप अ‍ॅण्ड कम्पाउंडिंगची नियमावली तयार करण्याचे निर्देश शासनाने जारी केले. ही नियमावली ७ आॅक्टोबर २०१७ रोजी जारी करण्यात आली होती. यामध्ये डिसेंबर २०१५ पूर्वी उभारलेल्या इमारती, घरांचे बांधकाम नियमापेक्षा जास्त असल्यास संबंधित मालमत्ताधारकांना महापालिकेत प्रस्ताव सादर करणे क्रमप्राप्त आहे. शासनाने प्रस्ताव स्वीकारण्याच्या मुदतवाढीचे अधिकार मनपाला दिले होते. यादरम्यान, हार्डशिपचे दर ‘ड’वर्ग महापालिकांना परवडणारे नसल्याचे समोर आल्यानंतर नगर विकास विभागाने फेरविचार करीत दर निश्चित करण्याचे अधिकार मनपाच्या स्तरावर महासभेला सोपविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.आक्षेप,सूचनांची मुदत संपुष्टात!हार्डशिप अ‍ॅण्ड कम्पाउंडिंग अंतर्गत लागू केलेले दर कमी करण्याच्या मुद्यावर शासनाने हरकती, सूचना व आक्षेप बोलाविले. ही मुदत २९ सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. यानंतर अधिसूचना जारी केली जाणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाGovernmentसरकार