शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांची बोळवण; मानधन थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:47 IST

अकोला : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे तब्बल सात महिन्यांचे मानधन थकीत असून, माजी नगरसेवकांचेसुद्धा पाच महिन्यांचे मानधन आणि बैठक भत्ता रखडला आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांमध्ये असंतोषमनपा कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे तब्बल सात महिन्यांचे मानधन थकीत असून, माजी नगरसेवकांचेसुद्धा पाच महिन्यांचे मानधन आणि बैठक भत्ता रखडला आहे.सणासुदीचे दिवस लक्षात घेता प्रशासनाने किमान तीन-चार महिन्यांचे मानधन अदा करण्याची नगरसेवकांना अपेक्षा आहे. यासंदर्भात काही नगरसेवकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता, त्यांची बोळवण केली जात असल्याने नगरसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होऊन मनपात दाखल होणार्‍या नगरसेवकांना मानधन देण्याची तरतूद आहे. ‘ड’ वर्ग महापालिकेतील नगरसेवकांना साडेसात हजार रुपये मानधन दिले जात होते. राज्य शासनाने मानधनाच्या रकमेत वाढ करून, जून महिन्यापासून दहा हजार रुपये मानधन देण्याचे निर्देश दिले आहेत. नगरसेवकांच्या मानधनात वाढ झाली असली, तरी मागील सात   महिन्यांपासून त्यांचे मानधन रखडले आहे. ८ मार्चपासून ते ८ ऑक्टोबरपर्यंत नवनिर्वाचित नगरसेवकांचे ४४ लाख ८१ हजार मानधनाची रक्कम थकीत आहे. सणासुदीचे दिवस लक्षात घेता, ही रक्कम प्रशासनाने अदा करण्याची गरज असल्याची भावना सर्वपक्षीय नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे.   

माजी नगरसेवकांचे मानधन रखडले! फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. ८ मार्चपासून नवनिर्वाचित नगरसेवकांनी कामकाज सांभाळले. यादरम्यान, माजी नगरसेवकांचेसुद्धा पाच महिन्यांचे मानधन रखडले आहे. ऑक्टोबर २0१६ ते मार्च २0१७ पर्यंत माजी नगरसेवकांचे ३0 लाख ७४ हजार रुपयांचे मानधन थकीत आहे. यामध्ये बैठक भत्त्याचा समावेश आहे. आजी-माजी नगरसेवकांचे मानधन अदा करण्याच्या मुद्यावरून प्रशासनाने चुप्पी साधणे पसंत केले आहे. 

जून महिन्यापासून रकमेत वाढ नगरसेवकांना दिल्या जाणार्‍या मानधनाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय शासनाने १२ जूननंतर लागू केला. अर्थात प्रशासनाला जून महिन्यापासून नगरसेवकांना दहा हजार रुपये मानधन अदा करावे लागेल. यासंदर्भात प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मनपा कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत!महापालिका कर्मचार्‍यांचे चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. यामध्ये सेवानवृत्त कर्मचार्‍यांच्या पेन्शनचा समावेश आहे. प्रशासनाला जीएसटीच्या बदल्यात ५ कोटी २७ लाखांचे अनुदान प्राप्त झाले असले, तरी कर्मचार्‍यांच्या वेतनावर दरमहा ७ कोटींचा खर्च होतो. त्यामुळे उर्वरित रकमेसाठी प्रशासनाला तडजोड करावी लागेल. दरवर्षीचा अनुभव पाहता निदान यंदा प्रशासनाने दिवाळीपूर्वी वेतन अदा करावे, असा सूर कर्मचार्‍यांमध्ये उमटत आहे.