शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जनता भाजी बाजारावर मनपाचा ‘वाॅच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST

अकाेला : काेराेनामुळे मध्यम व किरकाेळ व्यावसायिकांचे उद्याेग, व्यवसाय डबघाईस आले आहेत. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी ...

अकाेला : काेराेनामुळे मध्यम व किरकाेळ व्यावसायिकांचे उद्याेग, व्यवसाय डबघाईस आले आहेत. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी साेमवारी भाजप ओबीसी आघाडीचे महानगराध्यक्ष जयंत मसने, संजय गोटफोडे, रामेश्वर वानखडे, संजय तिकांडे, दिलीप भरणे, प्रदीप मांगूळकर, देवाशिष काकड यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली़

तरुणांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा!

अकाेला : १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे़ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नाेंदणी केल्यानंतरच संबंधित व्यक्तीला लस दिली जाणार असल्याने युवकांनी २८ एप्रिलपासून तातडीने नाेंदणी करण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांनी केले आहे़ काेराेनाचे संकट लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे पालन करून लसीकरण केंद्रांत गर्दी टाळण्याचे आवाहन धाेत्रे यांनी केले आहे़

जलवाहिनी टाकली; माती रस्त्यावर

अकाेला : शहरात जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम वेगात सुरू आहे़ जुने शहरातील डाबकी राेड पाेलीस ठाण्यासमाेर जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी रस्त्यालगत खाेदकाम केले हाेते. जाळे टाकल्यानंतर रस्त्यावर माेठ्या प्रमाणात माती साचली असून ती न हटविता कंत्राटदाराने गाशा गुंडाळला आहे़ यामुळे अपघाताची शक्यता बळावली असून मनपाचे दुर्लक्ष हाेत आहे़

अकाेला : काेराेना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापालिका प्रशासनाने जनता भाजी बाजार तसेच जैन मंदिरालगतच्या जुना भाजी बाजारात व्यवसाय करण्यावर निर्बंध घातले आहेत़ या ठिकाणी व्यावसायिकांनी व्यवसाय थाटल्यास त्यांना तातडीने हुसकावण्यासाठी मनपा प्रशासनाने बाजार व अतिक्रमण विभागावर जबाबदारी साेपवली आहे़

३ मे राेजी उघडणार पार्किंगची निविदा

अकाेला : शहरात विविध कामांसाठी दाखल हाेणाऱ्या नागरिकांना वाहने ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाकडून पार्किंग उपलब्ध करून दिली जाणार आहे़ त्यासाठी शहरातील १३ जागांची निवड करण्यात आली असून भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या जागेसाठी मनपाने निविदा प्रक्रिया राबवली आहे़ येत्या ३ मे राेजी निविदा उघडली जाणार आहे़

सफाई कर्मचाऱ्यांना हवी लाेटगाडी!

अकाेला : अरुंद व चिंचाेळ्या सर्व्हिस लाइनमध्ये जमा हाेणारा केरकचरा व घाण जमा करताना महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ अशा ठिकाणी नाल्यांची स्वच्छता केल्यानंतर जमा झालेली घाण व कचरा डाेक्यावर उचलून आणणे शक्य नसल्याने कर्मचाऱ्यांकडून लाेटगाडीची मागणी केली जात आहे़ मनपाने तयार केलेल्या अनेक लाेटगाड्या नादुरुस्त आहेत़